Goa Jetty Maintenance Delay Dainik Gomantak
गोवा

Khariwada Jetty Repair : खारीवाडा जेटीबाबत भेदभाव का? दुरुस्ती काम ठप्प, वावरणे झाले भीतीदायक

Vasco Khariwada Fishing Jetty : सरकारतर्फे या जेटीची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर स्वखर्चाने दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. खारीवाडा फिशिंग जेटीची दुर्दशा झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: खारीवाडा फिशिंग जेटीची दुर्दशा झाल्याने तेथे वावरणे भीतीदायक ठरले आहे. मत्स्योद्योग खाते गोव्यातील इतर फिशिंग जेटींची सुधारणा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, तर खारीवाडा फिशिंग जेटीबाबत भेदभाव करण्यामागील कोणते राजकारण आहे, असा संतप्त सवाल माजी मंत्री तथा गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी उपस्थित केला आहे.

सरकारतर्फे या जेटीची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर स्वखर्चाने दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. खारीवाडा फिशिंग जेटीची दुर्दशा झाली आहे. तथापि, त्या जेटीची योग्य दुरुस्ती करण्याची व योग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे.

परंतु या ना त्या कारणाने त्या जेटीच्या देखभालीकडे सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष करण्यात येते असा दावा नेहमी करण्यात येतो. येथे सुमारे दोनशे फिशिंग बोटी आहेत, ते या जेटीचा वापर करतात. परंतु जेटीच्या दुर्दशामुळे लाकडी बोटी जेटीवर नांगरता येत नाही. त्या जेटीपासून दूर नांगरण्यात येतात. येथे काही वेळा लाकडी बोटी धक्याला आपटल्याने बोट मालकांना नुकसान सहन करावे लागले, असे डिसोझा यांनी सांगितले.

या जेटीचा एक भाग कोसळल्याने व अद्याप दुरुस्ती करण्यात न आल्याने तेथून ये-जा करणे धोकादायक ठरले आहे. याप्रकरणी दखल घेताना मत्स्योद्योग खात्याने संपूर्ण जेटीची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याउलट तेथे पंधरा-वीस दिवसांपूर्वी दुसऱ्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावरील सिमेंट काँक्रीटची फोडाफोड करण्यात आली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांत तेथील काम पुढे सरकले नाही, त्यामुळे बोटीवरील कामगारांना जीव मुठीत घेऊन तेथून बोटीवर ये-जा करावी लागत आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.

ही जेटी पूर्वीच्या एमपीटीने तात्पुरत्या स्वरूपात बांधली होती. या जेटीची दुरुस्ती एमपीटीतर्फे करण्यात येत होती. या जेटीवर एमपीटीचा अधिकार असल्याने सरकारला तेथे कोणतीही सुधारणा वा दुरुस्ती करता येत नव्हती.

आपण जेव्हा असोसिएशनचा अध्यक्ष झाल्यावर मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांना भेटलो. त्यांच्यासमोर समस्या मांडल्यात. त्यामुळे त्यांनी त्या जेटीची सुधारणा, दुरुस्ती करण्यास आमची हरकत नसल्याचा ना हरकत दाखला दिला होता. तो आपण संबंधित सरकारी खात्याला दिला. असे असतानाही जेटीच्या दुरुस्तीबद्दल विलंब करण्यात येत असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

या जेटीची दुरुस्ती जून, जुलै महिन्यात होणे आवश्‍यक होते. परंतु ती करण्यात आली नाही. त्यामुळे तेथील एक भाग कोसळला. त्यानंतर तेथे संबंधितांनी भेटी देऊन पाहणी केल्या. दुरुस्तीचे आश्वासन दिले परंतु दुरुस्ती काम ठप्प झाले आहे. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करावयाचे नव्हते तर तेथे दुसऱ्या भागात काम सुरू का करण्यात आले, असा सवाल डिसोझा उपस्थित केला आहे.

शौचालयांची गैरसोय

तेथे शौचालयांची सोय करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बोटीवरील कामगारांना उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जावे लागत आहे. सरकार मालीम, कुटबण, बेतूल फिशिंग जेटीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. कुठ्ठाळी सारख्या लहान फिशिंग जेटीवर खर्च केला जातो. तेथे चांगल्या सुविधा देण्यात येतात, मग खारीवाडा फिशिंग जेटीच्या बाबतीत भेदभाव करण्यामागील कारण काय असावे असा प्रश्‍न डिसोझा यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT