
सासष्टी: कुटबण जेटीवर सरकारने ६९ शौचालयांची व्यवस्था केली असूनही ट्रक चालक व मजूर यांच्याकडून उघड्यावर शौच करण्याचे प्रकार चालूच आहेत. कुटबण येथील नागरिकांनी त्या संदर्भात आरोप केला आहे. जर हे प्रकार असेच चालू राहिले तर परिसरातील जलस्त्रोतांना त्याची बाधा पोहचेल व आरोग्याच्या समस्याही उदभवण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
जेव्हा ट्रॉलर समुद्रात गेलेले असतात तेव्हा एजन्टांचे ट्रक रांगेने जेटीवर रस्त्याच्या बाजूला तासंतास उभे केलेले असतात. मासळी घेऊन ट्रॉलर येत नाहीत, तो पर्यंत ट्रक चालक आपल्या वाहनात झोपतात. ट्रॉलर आल्यावर मासळी उतरविण्यास व ट्रकमध्ये घालण्यासाठी आणखी वेळ लागतो.
रस्त्याच्या बाजूला शौचालयाची व्यवस्था नसल्याने ट्रक चालक व मजूर उघड्यावरच शौच करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये कचरा फेकला जातो. त्यामुळे जेटी परिसरात कचऱ्याच्या राशी झालेल्या आहेत.
परिणामी स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे जेटीच्या प्रवेशद्वाराला गेट घालण्याचा व कार्यालयालगतच्या जागेत ट्रक पार्किंगचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ट्रक चालकांना व मजुरांना शौचालयाचा वापर करणे शक्य होईल, असे मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.