Vasco Jetty Repair Work Start  Dainik Gomantak
गोवा

Vasco Jetty : वास्को जेटी दुरुस्तीस प्रारंभ; ६५ लाख रुपये मंजूर

Vasco Jetty : मच्छीमारांना दिलासा; आमदारांकडून पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को, येथील खारीवाडा फिशिंग जेटीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. जेटीच्या दुरुस्तीसाठी ६५ लाख रुपये मंजूर केले आहेत. याकामी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पुढाकार घेतला.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी जेटीची पाहणी केल्यानंतर या जेटीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

खारीवाडा फिशिंग जेटीची दुर्दशा झाली होती. याप्रकरणी माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा आणि इतर मच्छीमारांनी आवाज उठविल्याने आमदार साळकर यांनी जेटीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत जलस्रोत खात्याचे अधिकारी तसेच गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी होते.

डिसोझा यांनी याठिकाणी अत्याधुनिक व प्रशस्त जेटी बांधण्यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिल्याचे सांगितले. त्यामुळे ही जेटी बांधण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत. यापूर्वीही जेटी बांधण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही जेटी अस्वच्छ असल्याचा अहवाल मस्त्योद्योग विभागाने दिला आहे. येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकामी आमदार साळकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तरंगती जेटी बांधणार

या जेटीसंबंधी इतर समस्याही लवकरच दूर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे येथे लवकरच तरंगती जेटी बांधण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल तयार केला आहे. येथे कायमस्वरूपी फिशिंग जेटी बांधण्यासाठी योग्यप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात येईल, असे आमदार साळकर यांनी सांगितले.

या जेटीच्या दुर्दशेसंबंधी मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या जेटीचे काम यापूर्वीच हाती घेण्यात येणार होते. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू झाल्याने कामाला विलंब झाला. लवकरच मासेमारी सुरू होईल. मच्छीमारांना त्रास होऊ नये, यासाठी या जेटीची दुरुस्ती त्वरित सुरू करण्यात येणार आहे.

- कृष्णा साळकर, आमदार, वास्को.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT