Taxi driver Prakash Naik Dainik Gomantak
गोवा

Vasco News : टॅक्सीचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाची रोकड तसेच पासपोर्ट दिला परत

Vasco News : त्यांनी तो तपासून पाहिला असता, त्यात टॅक्सीतून प्रवास केलेल्या महिला प्रवाशाचे २५ हजार रुपये आणि पासपोर्ट/व्हिसा होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, नवेवाडे-वास्को येथील टॅक्सीचालक प्रकाश नाईक यांनी प्रामाणिकपणा दाखवून महिला प्रवाशाची टॅक्सीत विसरलेली रोख रक्कम तसेच पासपोर्ट परत केला. याबद्दल प्रकाश नाईक यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युके येथील एका महिला प्रवाशाने दाबोळी विमानतळावरून काणकोणकडे जाण्यासाठी प्रीपेड टॅक्सी बुक केली. त्यानुसार नवेवाडे येथील टॅक्सीचालक प्रकाश नाईक यांना हे भाडे मिळाले.

नाईक हे त्या महिलेला काणकोण येथे नियोजितस्थळी सोडून परत आले. ट्रिपवरून घरी परतल्यानंतर कारची स्वच्छता करताना त्यांना लहान पाऊच दिसला. त्यांनी तो तपासून पाहिला असता, त्यात टॅक्सीतून प्रवास केलेल्या महिला प्रवाशाचे २५ हजार रुपये आणि पासपोर्ट/व्हिसा होता.

त्यांनी तात्काळ काणकोण येथे जाऊन तो पाऊच त्या महिलेला परत केला. टॅक्सीचालक प्रकाश नाईक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT