Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Health Service: गोव्यातील गावोगावी उत्तम आरोग्य सेवा पुरविणार! आरोग्यमंत्री राणेंची घोषणा; वास्कोत तपासणी शिबिर

Vishwajit Rane: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या माध्यमातून प्रजेच्या दारात आरोग्य सेवा नेण्यास सरकार कटिबद्ध असून जनतेला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही.

Sameer Panditrao

वास्को: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या माध्यमातून प्रजेच्या दारात आरोग्य सेवा नेण्यास सरकार कटिबद्ध असून जनतेला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन वेगवेगळ्या उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास येत आहे. यापुढे गावागावांत आरोग्य सेवा पुरविण्यात येईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

मोफत सल्लामसलत आणि एकाच छताखाली आरोग्य तपासणी करण्यात आली. वास्को येथील पालिका इमारतीत आज शनिवार ५ रोजी मेगा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या शिबिरात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागातील १३ सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. व्यासपीठावर आमदार दा‌जी साळकर, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. रूपा नाईक, डॉ. करिश्‍मा, गोवा डेंटल कॉलेज डीन डॉ. अनुराधा, आयडा नोरोव्हा, मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष गिरीष बोरकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, अर्बन हेल्थ सेंटर वास्कोचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगिरीश अवधी उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, आता गोव्यातील जनतेला आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी गोव्याबाहेर जाण्याची गरज पडणार नाही, कारण गोव्यात आता सगळ्या प्रकारच्या आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

आम्ही मंत्री, आमदार असलो म्हणून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सामान्य जनतेची सेवा करण्यास प्राधान्य देत असल्याचे राणे यांनी नमूद केले. आमदार साळकर यांनी आज वास्कोत जनतेच्या हितावह आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. आरोग्य सेवेबरोबर वास्कोच्या विकासासाठी आमदार साळकर कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात वास्कोचा विकास झपाट्याने होणार आहे.

आमदार कृष्णा साळकर पुरस्कृत नमो अॅम्बूलन्सचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. शिबिरात मधुमेह समुपदेशन, बालरोग ओपीडी, इएनटी ओपीडी, त्वचा ओपीडी, निरोगीपणा सत्र, पीएपी स्मीअर, ऑर्थोपेंडिक ओपीडी, स्त्रीरोग ओपीडी, आभा जनरेशन, आयुषसेवा, नेत्ररोग ओपीडी, औषध ओपीडी, मोबाइल व्हॅनसह डेंटल ओपीडी, स्तन तपासणी, हाडांचे आरोग्य निरीक्षण, शस्त्रक्रिया आदी ओपीडी सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

वैद्यकीय सल्ला घ्या!

साळकर म्हणाले, कोणताही आजार अंगावर न काढता ताब‌डतोब वैद्यकीय स‌ल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता आरोग्य सेवा तुमच्या दारी आहे. आम्ही लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास कटिबद्ध आहोत, आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. त्याचा लोकांनी लाभ उठवावा. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT