King Momo Carnival 2023 |Goa Carnival 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023 : वास्कोत 20 फेब्रुवारीला होणार कार्निव्हल फ्लोट परेड; समितीचे अध्यक्ष रॉड्रिग्स म्हणाले...

वास्को येथे 20 फेब्रुवारीला कार्निव्हलची फ्लोट परेड होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Carnival 2023 : नवीन वर्षानंतर गोव्यात प्रत्येकाला आतुरता असते ती कार्निव्हलची. काही दिवसांपासून पर्यटन विभागाकडे यंदाच्या 'किंग मोमो'साठी अर्ज येण्याची सुरुवात झाली आहे. यावर्षी वास्कोमध्ये होणारे कार्निव्हल गोव्यातील कलाकारांना आणि त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यावर भर देणार आहे. नवीन समितीने यावर्षी बॉलीवूड संगीताचा वापर न करता गोव्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्को येथे 20 फेब्रुवारीला कार्निव्हलची फ्लोट परेड होणार आहे.

वास्को कार्निव्हल समितीचे अध्यक्ष लिओ रॉड्रिग्स म्हणाले की, या वर्षी आम्ही 18 फेब्रुवारीपासून उत्सव सुरू करणार आहोत, जो पुढे चार दिवस चालेल. 20 फेब्रुवारीला फ्लोट परेड होईल. यानंतर 21 फेब्रुवारीला कार्निव्हल संपेल. आम्ही प्लास्टिक मुक्त कार्निव्हल घेण्याचे कठोरपणे ठरवले आहे.

आम्हाला कार्निव्हलसाठी जे बजेट मिळते ते कमी आहे. मागच्या वेळी आम्हाला 20 लाख दिले होते पण यावर्षी आम्ही किमान 30 लाखांची मागणी करणार आहोत. मला तिन्ही आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्या मार्गदर्शनाने मी यंदाचा कार्निव्हल आम्ही आणखी रंगतदार आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

समितीच्या उपाध्यक्षा फिओला रेगो म्हणाल्या, आमच्याकडे खेळ तियात्र, तियात्र, कोकणी संगीत रजनी इत्यादी गोष्टी असणार आहेत. या कार्निव्हलसाठी आम्ही गोव्याच्या संस्कृतीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

वास्को कार्निव्हल समितीसाठी 13 कार्यकारिणी आणि 11 सदस्य असणार आहेत. गोव्यात होणारे हे कार्निव्हल पाहण्यासाठी फक्त देशातलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटक या महिन्यात गोव्यात दाखल होत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT