Vasco Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Vasco Dengue Cases: सावधान! वास्को परिसरात सापडले डेंग्यूचे 27 रुग्‍ण

आरोग्यमंत्री राणे : गेल्‍या १८ महिन्‍यांतील संख्‍या; केपेत रुग्‍णसंख्‍या शून्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Dengue Cases: जानेवारी २०२२ ते जून २०२३ या काळात वास्कोत डेंग्‍यूचे २७ रुग्ण सापडले आहेत.

विशेष म्‍हणजे जनजागृती कार्यक्रम, प्रतिबंधक उपाययोजना, फॉगिंग, स्वच्छता मोहिमेनंतरही रुग्‍णांच्‍या संख्‍येत वाढ होत आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे केपे मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असूनही तेथील सरकारी आरोग्य केंद्रात डेंग्यूचे रुग्ण आढळल्‍याची नोंद नाही.

​मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आज गुरुवारी सभागृहात त्यांच्या मतदारसंघात डेंग्यू रुग्णांच्या संख्येबद्दल अतारांकित प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केपे मतदारसंघात डेंग्यू आणि मलेरियाचा एकही रुग्ण आरोग्य विभागाकडे नोंद झाला नसल्याचे नमूद केले.

केपे मतदारसंघात प्रतिबंधक उपाय, घरोघरी तपासणी, ताप सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

वास्को आणि परिसराबाबत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, तेथील नागरी आरोग्य केंद्राने वास्कोच्या विविध भागात साप्ताहिक स्वच्छता, फॉगिंग, जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत.

हेडलँड सडा येथील दवाखाना सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यरत असतो.

नवेवाडे येथे सर्वाधिक आठ रुग्‍ण

वास्कोत जानेवारी २०२२ ते जून २०२३ या काळात डेंग्यूचे २७ रुग्ण आढळले आहेत. त्‍यात नवेवाडे येथे ८, बोगदा २, बायणा २, हेडलंड सडा २, मेर्सिसवाडो १, साईनगर १, सैबिन भाट १, ड्रायव्‍हरहिल १, मंगोरहिल ५, मेन शहर ३ आणि शांतीनगर १ असे एकूण २७ डेंगूचे रुग्‍ण आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT