Vasco Advocates Association  Dainik Gomantak
गोवा

Vasco : हल्लेखोर पोलीसांना अटक करा; गजानन सावंत हल्ला प्रकरणी अ‍ॅडव्होकेट असोसिएशन आक्रमक

वास्को अ‍ॅडव्होकेट असोसिएशन घेतली बैठक

दैनिक गोमंतक

वास्को : अ‍ॅड. गजानन सावंत यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याचा वास्को ॲडव्होकेट्स असोसिएशनच्यावतीने निषेध करण्यासाठी आज वास्को येथे बैठक पार पडली. यावेळी आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा वास्को अ‍ॅडव्होकेट असोसिएशन मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न मांडेल अशी भुमिका असोसिएशनने घेतली.

(Vasco Advocates Association demanded the arrest of the police who attacked Gajanan Sawant)

अ‍ॅड. गजानन सावंत यांच्यावर पोलिसांकडूनच झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयितांवर गुन्हे नोंद करण्यास विलंब लावला. पर्वरी येथे हा प्रकार गुरुवारी घडला. गुन्हे नोंद झाल्यानंतर सर्वसामान्यांप्रमाणेच संबंधित पोलिसांना निलंबित करत त्यांना अटक करण्याची मागणी वास्को अ‍ॅडव्होकेट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

वास्को अ‍ॅडडव्होकेट असोसिएशन व्यवस्थापकीय समितीची बैठक आज पार पडली. यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. गजानन सावंत यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याचा वकिलांनी तीव्र निषेध केला. अ‍ॅड. सावंत यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असलेल्या चारही पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व बाबतीत तपास पूर्ण होईपर्यत त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी केली.

9 डिसेंबर रोजी पोलिस कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करूनही आजपर्यन्त कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यावरून पोलिस कर्मचारी आणि तपास यंत्रणा (गुन्हे शाखा) आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. हल्ल्यात सामील असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी कारण ते पुरावे नष्ट करू शकतात. अ‍ॅड. सावंत विरोधात खोटा एफआयआर दाखल करून त्यांच्यावर दबाब टाकण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली.

गोव्यातील कोणताही वकील आरोपी पोलिस कर्मचा-यांचे कोणत्याही न्यायालयासमोर प्रतिनिधित्व करणार नसल्याचे ते म्हणाले. जर तपास यंत्रणा योग्य तपास करत नसेल तर आवश्यकतेनुसार वास्को ॲडवोकेट्स असोसिएशन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून योग्य दिशा देण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. चेतन पालेकर, अ‍ॅड. मोरीन ॲब्रवि, अ‍ॅड. अमेय शेट्ये, ॲड. सोनिया रेडकर, अ‍ॅड. विमनी रेडकर, ॲड. गणेश कांबळे, अ‍ॅड. दिलेश्वर नाईक व इतर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT