Vasantotsava dainikgomantak
गोवा

बेतकी-खांडोळ्यात रंगणार ‘वसंतोत्सव’

पणजी, फोंडा, मडगाव या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध

दैनिक गोमन्तक

पणजी : आपल्या चतुरस्त्र गायनाने व मराठी संगीत नाटकांना पूनर्जिवीत करणारे लोकप्रिय गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दिपूर्तीनिमित्त राज्यात शनिवारी २६ रोजी ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बिग बी हॉल माशेल बेतकी खांडोळामध्ये सायंकाळी ५.४५ वाजता रंगणार आहे, अशी माहिती या महोत्सवाचे संयोजन प्रमुख राजस उपाध्ये यांनी दिली.

‘वसंतोत्सवा’त (Vasantotsava) ‘वसंतराव एक स्मरण’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये वसंतरावांचे नातू व आजच्या पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे (Singer Rahul Deshpande) यांच्यासह, गायिका प्रियांका बर्वे, निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), प्रसाद जोशी (पखवाज), रोहन वणगे (विविध तालवाद्य) हे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी करणार आहेत.

पं. वसंतराव यांच्या जीवनावर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटातील काही दृश्ये कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहे. एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी (MIT World Peace University) या कार्यक्रमाचे सहआयोजक आहेत. तसेच लोकमान्य को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी व ईएसजी एन्टरटेन्मेंन्ट हे या कार्यक्रमाचे पार्टनर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT