Varunapuri Mangor Hill Dainik Gomantak
गोवा

Mangor Hill: ..अखेर तोडगा निघाला! वरुणपुरी-मांगोरहिल येथील धार्मिक स्थळांवर वाहने जाणार, नौदल राजी

Varunapuri Mangor Hill: वरुणपुरी-मांगोरहिल येथील धार्मिक स्थळांकडे वाहने नेण्यासंबंधी भाविक व नौदल यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधणारा तोडगा आमदार कृष्णा साळकर यांनी काढल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Sameer Panditrao

वास्को: वरुणपुरी-मांगोरहिल येथील धार्मिक स्थळांकडे वाहने नेण्यासंबंधी भाविक व नौदल यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधणारा तोडगा आमदार कृष्णा साळकर यांनी काढल्याने समाधान व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आल्यावर तेथील ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नौदलाकडे असलेल्या तेथील जागेएवढीच दुसरी पर्यायी जागा नौदलाला दुसरीकडे देण्यात येणार आहे, असं साळकर यांनी सांगितले.

वरुणपुरी-मांगोरहिल येथे राम मंदिर, काली मंदिर, सेंट मेरीज ऑर्थोडॉक्स चर्च ही धार्मिक स्थळे गेल्या ५०- ६० वर्षापासून तेथे आहेत.

नौदलाला पर्यायी जागा

सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात भाग पडल्याचे नौदलाने यावेळी स्पष्ट केले. मात्र नौदल व स्थानिकांमध्ये समन्वयक राहण्यासाठी सर्वमान्य तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नौदलाला त्या जागेच्या बदल्यात जवळपास दुसरी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथील स्थिती जैसे थे राहणार आहे. मात्र भाविकांनीही तेथे अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT