Varsha Usgaonkar In Goa: गोव्याची लेक आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी जानेवारी महिन्यात मंगेशी मंदिराला भेट दिली. दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच वर्षा उसगांवकर यांचा मंगेशी मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
गेल्या महिन्यात वर्षा उसगांवकर गोव्यात होत्या. त्यादरम्यान त्यांनी गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिराला भेट दिली होती. त्यांनी भगवान महादेवाची मनोकामना केली. यावेळी, वर्षा उसगांवकर यांनी मराठमोळा साजशृंगार केला होता. वर्षा उसगांवकर या मूळच्या उसगावच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण उसगावातच झाले. त्या आपल्या व्यस्त कामातून वेळात-वेळ काढून गोव्याला येत असतात.
भगवान महादेवांचा अवतार म्हणून मंगेशी मंदिर ओळखले जाते. हे गोव्यातील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. मंगेशी मंदिराचा उगम शतकांपूर्वीचा आहे आणि हा इतिहास गोव्याच्या इतिहासाशी खोलवर गुंफलेला आहे. मूळ मंदिर 10 व्या ते 14 व्या शतकापर्यंत गोव्यावर राज्य करणार्या कदंब राजवंशाच्या सुरुवातीच्या काळात स्थापित केले गेले असे मानले जाते. मंदिर मूळतः कुठ्ठाळी परिसरात होते. 16व्या शतकात पोर्तुगीज काळात, धार्मिक धोरणांमुळे अनेक हिंदू मंदिरे नष्ट झाली किंवा स्थलांतरित झाली. मंगेशी मंदिर देखील फोंडा तालुक्यातील प्रियोळ गावातील मंगेशी येथील सध्याच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.