Varkhande
Varkhande Dainik Gomantak
गोवा

World Book Day : वारखंडे येथे जागतिक पुस्तक दिन उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

World Book Day :

बोरी, प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा वाचनामुळे होतो. विद्यार्थ्यांचे बहुतांश यश हे वाचनावरच अवलंबून असते.

वाचनाने माणसाची बौध्दिक पातळी वाढते. म्हणूनच प्रत्येकाने वाचनासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी केले.

प्रागतिक विचार मंच गोवातर्फे वारखंडे येथील जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. डॉ. अनिता तिळवे, संस्थेचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, महेश पारकर, कवी विनोद नाईक, राया बोरकर, आनंद पेडणेकर, हेमंत खांडेपारकर, बाबलो पारकर, राया बोरकर, रमेश वंसकर, डॉ. संतोष तिळवे, ममता नाईक,

माधुरी शेणवी उसगावकर, एम.जे. कामत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनिता तिळवे, महेश पारकर, विनोद नाईक यांचेही पुस्तक दिनाचे महत्त्व सांगणारे भाषण झाले. विनोद नाईक यांनी पुस्तक दिनावर कवितेचे वाचन केले.

जयवंत आडपईकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आनंद पेडणेकर, विनोद नाईक यांनी पाहुण्यांना गुलाबपुष्पे दिली. माधुरी शेणवी उसगावकर यांनी सूत्रसंचालन केले. राया बोरकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Goa Rain : आला पावसाळा...काळजी घ्या, आरोग्य सांभाळा; डेंग्यू, मलेरियाबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Crime News : नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Panaji News : वेश्या व्यवसायातील २१ कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT