Ponda News 
गोवा

Ponda News : युवा वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी गोमंतक गौड मराठा समाजातर्फे फोंड्यात विविध उपक्रम

रविवारी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

गोमंतक गौड मराठा समाजातर्फे समाजातील युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात असून येत्या रविवारी २३ रोजी कुर्टी - फोंड्यात आठ तालुका मर्यादित गोमंतक गौड मराठा समाज फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंबंधीची माहिती फोंड्यात आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. माजी आमदार प्रसाद गावकर यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष मधू गावकर तसेच भोला गावकर, रमाकांत गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कुर्टी येथील पशुसंवर्धन खात्याच्या मैदानावर ही स्पर्धा रविवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार असून फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक या स्पर्धेचे उद्‍घाटन करतील.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती रमेश तवडकर तसेच माजी मंत्री पांडुरंग मडकईकर व इतर मान्यवरांची उपस्थिती असेल.

विजेत्यांना चषक तसेच रोख रु. ३३ हजार ३३३ देण्यात येतील, तर उपविजेत्यांना चषक व रोख रु. २२ हजार २२२ देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत अन्य विविध बक्षिसांचाही समावेश असून त्यात वैयक्तिक स्तरावरही उत्कृष्ट खेळाडूंना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT