Goa Mansoon Update : जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यात पडझड सुरूच!

वीजपुरवठा खंडित ः चार दिवसांत एकूण १० लाखांचे नुकसान
Goa Mansoon
Goa MansoonDainik Gomantak

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू असून सोनाळ येथे रस्ता पाण्याखाली गेली होता. तर केरी मार्गावरील केळावडे, रावण मार्गावरील रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे पाणी भरून पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ती आटोक्यात आली आहे. मात्र झाडांची पडझड सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. चोर्लातही वाहतूक कोंडी झाली होती. goa mansoon heavy rain water tree collapsed road power shut down traffice jam

आज दिवसभर अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू होती. रात्री नानोडा सत्तरी येथे रस्त्यावर भले मोठे रानटी झाड वीज तारांवर पडून वीजपुरवठा खंडीत झाला. आज सकाळी चोर्ला घाटावर रानटी झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. पाडेली-सत्तरी येथे लक्ष्मी बार येथील संरक्षण कुंपणावर वडाचे झाड पडून मोठे नुकसान झाले.

Goa Mansoon
Goa Monsoon 2023: ‘तिलारी’तून विसर्ग शक्‍य; डिचोली, पेडणेतील 'या' गावांना सतर्कतेचा इशारा

डोंगुर्ली-ठाणे येथे रस्त्यावर रानटी झाड पडले.धारकण-सत्तरी येथील पुल मार्गावरील रस्त्यावर रानटी झाड पडले. शेळ-मेळावली रस्त्यावर रानटी झाड पडले, पर्ये-सत्तरी येथील गुरवाडा-आयी मार्गावरील रस्त्यावर रानटी झाड पडले.

Goa Mansoon
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव

वीज खात्याचे नुकसान

चार दिवसांपासून मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे सत्तरीत अनेक भागात झाडांची पडझड सुरूच आहे. त्यामुळे या चार दिवसात वीज खात्याचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झालेले आहे. त्यात वीज तारा तुटणे, विजेते खांब मोडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून एकूण १० लाखांचे नुकसान झालेल्या माहिती वाळपई वीज कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com