Vand Bharat Train  Dainik Gomantak
गोवा

वंदे भारत ट्रेनचं गोवा कनेक्शन माहित आहे का ?

केंद्राने 400 सेमी-हाय स्पीड 'वंदे भारत' ट्रेन्स तयार करण्याची आणि चालवण्याची योजना जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यामधील किनको लिमिटेड (Kineco Limited) ही कंपनी वंदे भारत ट्रेनसाठी लागणारे 'फ्रंट स्ट्रक्चर' पुरवत आहे. Kineco कंपनीला वंदे भारत ट्रेनसाठी 68 'नोज कोन' पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

किनेकोचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर सरदेसाई यांनी सांगितले की, त्यांची कंपनी सप्टेंबरमध्ये बर्लिन येथे होणाऱ्या InnoTrans 2022 एक्स्पोमध्ये हायस्पीड ट्रेनसाठी उपयुक्त उत्पादने सादर करणार आहे.

"मला घोषणा करताना अभिमान वाटतो की ही उत्पादने ट्रेन तंत्रज्ञानाशी निगडीत तज्ञांच्या नेतृत्वाखाली पिळर्ण येथील विकास केंद्रात आमच्या अंतर्गत संशोधनाद्वारे विकसित केली गेली आहेत," सरदेसाई म्हणाले.

केंद्राने 400 सेमी-हाय स्पीड 'वंदे भारत' ट्रेन्स तयार करण्याची आणि चालवण्याची योजना जाहीर केली आहे. या ट्रेन 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहेत. किनेकोचा रेल्वे विभाग पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेट येथील रेल्वे उत्पादन सुविधेत 'नोज कोन' तयार करत आहे. ही फर्म 15 वर्षांहून अधिक काळ भारतीय रेल्वेला लागणारे पार्टचा पुरवठा करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT