Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express: ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची तिकिटे आता वेटींगवर!

Vande Bharat Express: लोकप्रियता वाढली: प्रतीक्षा यादी; डबे वाढविण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express:

मडगाव - मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तेव्हा तिच्या 1 हजार 900 रुपयांच्या तिकीटामुळे कोण प्रवास करणार अशी विचारणा करण्यात येत होती. आता त्या रेल्वेगाडीचे आठवडाभराचे तिकीट मिळणे मुश्कील झाले असून प्रवाशांची प्रतीक्षा यादी तयार होऊ लागली आहे.

विमानासारखा आरामदायी प्रवास लोहमार्गावर करा अशी जाहिराजबाजी करून ही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्यात आली आहे. गोवा हे नावाजलेले पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची मोठी पसंती या गाडीला मिळेल असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे होते. ते अल्पावधीत खरे ठरले आहे.

गोवा ते मुंबई आणि मुंबई ते गोवा या दोन्ही दिशेने जा ये करणाऱ्या प्रवाशांची मोठी पसंती या गाडीला मिळू लागली आहे. या गाडीने सुरवातीपासूनच प्रवाशांमध्ये लक्षणीय लोकप्रियता मिळवली आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने सातत्याने सरासरी ९५ प्रवासी दर राखला आहे. या गाडीच्या सध्याच्या फक्त ८ डब्यांमुळे अनेकांना या गाडीचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे.

जागांची मर्यादित उपलब्धता हा प्रश्न आता कोकण रेल्वेला भेडसावू लागला आहे. यामुळे प्रवासी वर्गाकडून ही गाडी 16 डब्यांची करावी अशी मागणा वाढू लागली आहे. काही प्रवाशांनी तर थेटपणे कोकण रेल्वेकडे ईमेल पाठवून ही मागणी केली आहे. अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी या गाडीची क्षमता वाढवल्याने सध्याची आसनांची कमतरता तर दूर होईलच, पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करेल याकडे प्रवासी लक्ष वेधू लागले आहेत.

या गाडीला मोठी मागणी पहिल्या दिवसापासून आहे. आता तर प्रतीक्षा यादी तयार करावी लागत आहे. पुढे या गाडीचे डबे वाढवण्याचा विचार करावा लागणार आहे, पण त्यासाठी डब्‍यांची उपलब्धतेसह इतर बाबींचा विचार करावा लागेल.
- बबन घाटगे, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT