Goa election 2022 News Updates Dainik Gomantak
गोवा

काणकोणात अपक्ष उमेदवारांचा भाव वधारला

दैनिक गोमन्तक

काणकोण: राज्यातील अस्थिर मतदार कौलाच्या पार्श्वभूमीवर काणकोणातील अपक्षाचा भाव वधारला आहे. काणकोणातील आठ उमेदवारांपैकी पाच राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तीन अपक्ष उमेदवारांपैकी इजिदोर फर्नांडिस व विजय पै खोत यांचा सध्या बोलाबाला आहे.

भाजपचे उमेदवार रमेश तवडकर निवडून आले आणि भाजप सत्तेत आला नसला तरी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असे दिसते. तर कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी पक्ष सत्तेपासून दूर राहिला तरी भाजपला समर्थन देतील हे भाकित करणे स्वप्नवतच आहे. मात्र, माजी आमदार विजय पै खोत किंवा माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना निवडून आल्यास सर्वच मार्ग मोकळे आहेत. यापूर्वीच अपक्ष उमेदवारांनी सर्वच पक्ष संपर्कात असल्याचे सांगितले होते. (Goa election 2022 News Updates)

तृणमूल कॉंग्रेसचे महादेव देसाई, आपचे अनुप कुडतरकर व आरजीचे प्रशांत पागी यांनी कुणाच्या मतावर डल्ला मारला यावर या चार होतकरू उमेदवाराचा विजय निश्चित करणार आहे.

2017 निवडणुकीत कॉंग्रेसचे विजयी उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांनी 10853 मते मिळवून भाजपचे उमेदवार विजय पै खोत यांचा 2108 मताधिक्याने पराभव केला होता. त्यांना 38.50 टक्के मते मिळविण्यास यश मिळाले. पै खोत यांना 8745 म्हणजे 31.02 टक्के मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार रमेश तवडकर यांना 7739 मते म्हणजे एकूण मतदानाच्या 27.46 टक्के मते मिळाली. त्या निवडणुकीत 33,233 मतदारांपैकी 28,187 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2022 च्या निवडणुकीत काणकोण मतदारसंघात 34,242 मतदारांपैकी 28,114 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. काणकोण मतदारसंघात 276 मतदारांपैकी 80 वर्षांवरील 63 दिव्यांग मतदार आहेत.

276 वर्षांवरील मतदारांपैकी 266 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सहा मतदारांचा मृत्यू झाला आहे. तीन मतदारांचा पत्ता सापडत नाही तर एका मतदारावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. 63 दिव्यांग मतदारांपैकी सर्वांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्याशिवाय 840 सरकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान केले. त्यामुळे काणकोण मतदारसंघात एकूण 29,283 मतदान झाले आहे.

एकूण मतदारांपैकी 85.51 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर 2017 च्या निवडणुकीत 84.81 टक्के मतदारांनी मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीत ही टक्केवारी 0.60 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढीव टक्केवारी कोणाच्या पथ्थ्यावर पडेल, हे 10 मार्चला कळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT