Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

Valpoi Unseasonal Rain: वाळपई परिसरात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई परिसरात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले. अचानक आलेल्या या वादळामुळे वाळपईत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. अनेक घरांसह वाहनांवरही झाडे कोसळल्याने लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

वाळपई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शनिवारी रात्रभर मदतकार्य केले. त्यांनी टप्प्या-टप्प्याने रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घरांवर पडलेली झाडे सकाळी हटविण्यात आली.

नाणूस येथील विश्वनाथ गावकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने मदतकार्य करून सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली. पवन वेलिंगकर यांच्या घराबाहेर उभ्या केलेल्या कारवर फणसाचे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले, तर अग्निशमन दलाने सुमारे २ लाखांची मालमत्ता वाचविली.

सुरेश पोकळे यांच्या बेकरीवर आंब्याचे झाड कोसळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घराच्या छपरासह इतर साहित्याचेही नुकसान झाले. येथेही अग्निशमन दलाने सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविली.

नामदेव नाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे १० हजारांचे नुकसान झाले. नाणूस येथील युनूस आगा यांच्या घरावर नारळाचे झाड पडून सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले, तर अग्निशमन दलाने ५० हजारांची मालमत्ता वाचविली. नाणूस परिसरात आणखी एका घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले. डॉ. दलाल यांच्या घरावरही झाड कोसळले. या सर्व दुर्घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाळपईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी वीजखांबही कोसळले. परिणामी वाळपईसह आसपासच्या भागात वीजपुरवठा खंडित झाला. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत वीजवाहिन्यांची दुरुस्ती सुरू केली असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

१२ ठिकाणी रस्त्यांवर झाडाझडती

सुमारे १२ ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद झाले होते. विशेषतः वाळपई-नाणूस मार्गावर चार ठिकाणी मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुख्य म्हणजे नाणूस या वाळपईतील प्रभाग क्रमांक पाचला चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT