वाळपई: डोंगुर्ली-ठाणे पंचायतीत ‘स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमांतर्गत गरजूंना सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच पंचायत सभागृहात करण्यात आले होते.
शिबिरात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली आणि थेट अर्ज भरून घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ५० लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे, या शिबिरासाठी नागरिकांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणून नोंदणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे पंचायतचे सरपंच नीलेश परवार होते.
यावेळी उपसरपंच सोनिया गावकर, पंच सुरेश आयकर, विनायक गावकर, सुभाष गावडे, सरिता गावकर, अनुष्का गावस, तनया गावकर, पंचायत सचिव सर्वेश गावकर, समाजकल्याण खात्याचे उदय शेटकर तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते. शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.
विकासाला मिळाली चालना
सरपंच नीलेश परवार यांनी सांगितले की, आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनामुळे ठाणे पंचायतीच्या विकासाला चालना मिळत आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियानामुळे सरकारी योजना नागरिकांच्या दारी पोहोचत आहेत. गरजू लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागात पाणी प्रश्न, रस्ते, विजेचे भांडवली काम या सर्व बाबींच्या संदर्भातही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.