Report: पाकिस्तानात 8700 दहशतवादी सक्रिय! संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा, भारतासाठी धोक्याची घंटा

UN Report: संयुक्त राष्ट्रांच्या सँक्शन मॉनिटरिंग रिपोर्टने (Sanctions Monitoring Team Report) एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Terrorists
TerroristsDainik Gomantak
Published on
Updated on

UN Report: संयुक्त राष्ट्रांच्या सँक्शन मॉनिटरिंग रिपोर्टने (Sanctions Monitoring Team Report) एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अहवालानुसार, मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आयएसआयएल-खोरासानचा (ISIL-K) धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संघटनेकडे सुमारे 2 हजार स्थानिक दहशतवादी आहेत आणि ते मध्य आशिया आणि रशियाच्या उत्तर काकेशसमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रियपणे भरती करत आहेत.

पाकिस्तानमध्ये 8700 दहशतवादी!

दरम्यान, या अहवालात आयएसआयएल-खोरासानची पाळेमुळे पाकिस्तानात (Pakistan) रुजलेली असल्याचेही नमूद केले आहे. पाकिस्तानात एकूण 8700 दहशतवादी (Terrorists) या क्षेत्राला हादरवण्यासाठी तयार बसले आहेत. आयएसआयएल-खोरासान लहान मुलांवरही लक्ष केंद्रित करत आहे. अहवालानुसार, ही संघटना अफगाण मदरशांमध्ये मुलांना प्रशिक्षण देत आहे, इतकेच नाहीतर 14 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांसाठी आत्मघाती प्रशिक्षण शिबिरेही (Suicide Training Camps) चालवत आहे.

Terrorists
India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

अल-कायदा आणि टीटीपीचा धोका

अल-कायदा (Al-Qaeda) आधीपासूनच अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) प्रशिक्षण शिबिरे चालवत आहे, त्यापैकी काही शिबिरे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (Tehrik-e-Taliban Pakistan - TTP) दहशतवाद्यांनाही प्रशिक्षण देतात. टीटीपीकडे 6 हजार दहशतवादी आहेत, ज्यांना अफगाणिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांचाही पाठिंबा आहे आणि आयएसआयएल-खोरासानसोबत त्यांचे सामरिक संबंध आहेत. टीटीपी अत्याधुनिक शस्त्रांचा (Advanced Weapons) वापर करुन मोठे हल्ले करते. तसेच, बलूचिस्तानमध्ये (Balochistan) दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचा आरोप आहे.

Terrorists
Pakistan: देशाला उद्धवस्त करणारा हल्ला होणार, ओसामा खानच्या भविष्यवाणीने पाकड्यांची उडाली झोप; एअरस्पेस केला बंद

पाकिस्तानचे दहशतवादाकडे दुर्लक्ष भारतासाठी घातक

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या लढवय्यांनाही याच शिबिरांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यात बीएलएच्या मजीद ब्रिगेडचा (Majid Brigade) समावेश आहे, जी दक्षिण अफगाणिस्तानमध्ये टीटीपी आणि अल-कायदासोबत मिळून प्रशिक्षण शिबिरे चालवत आहे. 11 मार्च रोजी बीएलएने पाकिस्तानमधील एका ट्रेनचे अपहरण करुन 31 लोकांची हत्या केली होती.

पाकिस्तान सरकारची दहशतवाद्यांप्रतीची नरमाई आता त्यांच्यावरच भारी पडत आहे. हे सर्व दहशतवादी अफगाण भूमीचा वापर करुन पाकिस्तानवरही हल्ले करत आहेत. यामुळे बलूचिस्तानसारख्या भागात पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली आहे. मात्र, येथे अस्थिरता निर्माण होणे भारतासारख्या शेजारील देशांसाठी धोकादायक ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com