Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे : विश्‍वजीत कृ. राणे

Valpoi News : शांतादुर्गा कला मंचतर्फे व्यक्तिमत विकास कार्यशाळा

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, जीवनातील यशासाठी आवश्यक असलेले सर्व कौशल्य आत्मसात करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगी बाणवणे गरजेचे आहे.

सरकारी नोकरी च्या मागे न राहता इतर क्षेत्रात नावलौकीक केला पाहिजे, असे प्रतिपादन होंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होंडा कृष्णराव राणे मेमोरियल उच्च माध्यमिकचे चेअरमन विश्‍वजीत कृष्णराव राणे यांनी होंडा सत्तरी येथील साईकृपा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

मासोर्डे वाळपई येथील श्री शांतादुर्गा कला मंच आणि गोवा राज युवा व्यवहार खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खास विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजित केली होती. शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेचे खास आमंत्रित म्हणून अविन नाईक, समीर प्रभू, प्राचार्य अशोक नाईक, सत्तरी तालुका क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे अधिकारी दिलीप गावकर, श्री शांतादुर्गा कला मंचचे अध्यक्ष रमेश गावस, सचिव कृष्णा गावस आदींची उपस्थिती होती.

यावेळी अविन नाईक म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे व्यक्तीमध्ये असलेले काही स्वभावदोष घालवून आदर्श व्यक्तिमत्त्व विकसित करणे. समीर प्रभु यांनी टाइम मॅनेजमेंट, अध्यात्म आणि मूल्य शिक्षणावर मार्गदर्शन केले. धनश्री गावस, रोशन गावडे, दीक्षा मळीक यांनी स्वागत केले. स्वागत रमेश गावस यांनी केले. सूत्रसंचालन सपना सामंत यांनी केले.

शहीद भगत सिंह यांचे स्मरण

क्रांतीवीर भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांनी आपल्या देशासाठी हसत हसत फासावर चढून बलिदान दिले होते. या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगतसिंह यांच्या फोटोला पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT