valpoi ground Dainik Gomantak
गोवा

Valpoi Ground: क्रीडाप्रेमींमध्ये समाधान; वाळपई पालिका मैदान दुरुस्ती पूर्ण!

Sports Ground: क्रीडाप्रेमींमध्ये समाधान: लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार

दैनिक गोमन्तक

Valpoi Ground: जवळपास पाच वर्षांपूर्वी ठाणे मार्गावरील वाळपई पालिका मैदानाचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते. आज, उद्या करत करत अखेर पाच वर्षांनी मैदानाला फायनल टच मिळाला आहे. गतवर्षी हिरवळ घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

आता मैदानाचे काम पूर्ण झाल्याने क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच उद्‍घाटनाची तारीख ठरणार असल्याचे नगराध्यक्षा शेहजीन शेख यांनी सांगितले. वाळपई पालिका मैदानाचे अर्धवट काम खेळाडूंसाठी त्रासदायक ठरत होते.

पाच वर्षांपूर्वी या मैदान दुरुस्तीसाठीची पायाभरणी झाली होती. पण काहीना काही व्यत्यय येऊन दुरुस्ती काम रखडत होते. त्यामुळे युवा वर्गाचा हिरमोड होत होता.‘गोमन्तक’ने गेली दोन वर्षे या मैदानाच्या दुरूस्ती कामाचा विषय वेळोवेळी लावून धरला होता.

वाळपई पालिकेला सरकारकडून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक कोटींचा निधी विकास कामांसाठी मिळाला होता. त्यातून पालिकेने ठाणे मार्गावरील पालिका मैदानाच्या दुरुस्तीसाठी निधी वापरला होता. मैदानाला चारही बाजूंनी कुंपण घातले होते.

भराव टाकून जमीन समतल केली असून त्यावर हिरवळ घातलेली आहे. विद्युत झोताचीही व्यवस्था केली आहे. यामुळे समाधान व्यक्त करून क्रीडाप्रेमींनी आरोग्यमंत्री राणेंचे आभार मानले.

मैदानावरील हिरवळीचे काम होऊन आता विद्युत झोतासाठी दिवे बसवले असून चाचणीही घेतली आहे. काही किरकोळ कामच राहिले असून तेही पूर्ण होईल. पण मैदान आता सुसज्ज बनले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. लवकरच उद्‍घाटनाची तारीख ठरवून मैदान लोकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.-शेहझीन शेख, नगराध्यक्षा वाळपई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT