वाळपई : सावर्डे-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रात वसलेल्या सोनाळ, तार, कडतरी या गावांचा पुरामुळे संपर्क नेहमीच तुटलेला असतो. म्हादई नदीला प्रचंड पाणी येऊन पाण्याचा शिरकाव वरील गावांच्या रस्त्यावर झाल्याने रस्ता पाण्याखाली जातो. यंदाही तीच स्थिती निर्माण झाली होती.
वास्तविक वरील तिन्ही गावांना दरवर्षी फटका पावसाळ्यात बसत असतो. सावर्डे पुलानजीक असलेल्या तार येथे सोनाळ मार्गावर दरवर्षी पाणी तुंबते. या भागात रस्ता अगदी सखल असल्याने म्हादई नदीला उधाण आले की ते पाणी तार रस्त्यावर जमा होते.
रस्त्यालगत असलेल्या घरांनादेखील पाणी लागते. मंगळवारी (ता.१५) मुसळधार पावसामुळे सोनाळ, कडतरी गाव संपर्काबाहेर गेले होते. दुपारी पाणी ओसरले होते.
गावांशी संपर्क तुटलेल्या सोनाळ, कडतरी या भागातील बागायती दरवर्षी या पुराच्या कचाट्यात सापडत आहेत. पुराचे पाणी बागायतीत घुसल्याने मोठा फटका बसतो. शाळाही बंद ठेवाव्या लागतात. जंगल व काजू बागायत क्षेत्रातून पूर्वीपासून असलेल्या पायवाटेने चालत जाण्याची वेळ दरवर्षी येते.
दूध व्यावसायिकांनाही आडवाटेने चालत जावे लागते. तार येथे रस्त्यावर पाणी येणे नेहमीचेच बनले आहे. त्यासाठी तार गावातील रस्त्यापासून ते सोनाळ येथील मारुती मंदिरापर्यंत उंच रस्ता करावा. यासाठी सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे.
लोक जातात आडवाटेने!
वरील ठिकाणी म्हादई नदीचे पाणी आल्याने मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांनी आपापली वाहने तार गावाच्या ठिकाणी ठेवली व तिथून पायी चालत धावे गावच्या हद्दीतून एका वाटेने घरचा रस्ता धरला होता. हा प्रकार दरवर्षीचाच बनलेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.