Valpoi Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Shigmotsav: वाळपई ‘ओस्सय ओस्सय’ने दुमदुमली! लोकोत्सवाला सुरुवात; दिव्या राणेंच्या हस्ते शोभायात्रेचे उद्‍घाटन

Goa Shigmotsav 2025: राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा, वेशभूषा, लोकनृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sameer Panditrao

वाळपई: गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने सत्तरी तालुका शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित लोकोत्सवाचे गुरुवारी सायंकाळी वाळपई फोंडा जंक्शन येथे थाटात उद्‍घाटन करण्यात आले. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेला सुरवात झाली.

यावेळी वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, नगरसेवक शेहझीन शेख, विनोद हळदणकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, नगरगाव जि.पं.सदस्य राजश्री काळे, होंडा जि पं. सदस्य सगुण वाडकर, केरी जि.पं.स. देवयानी गावस, समितीचे उपाध्यक्ष विनोद शिंदे, खजिनदार प्रसाद खाडिलकर, उसगावचे जि. पं. सदस्य उमाकांत गावडे तसेच विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच, वाळपईचे नगरसेवक आदी आदी उपस्थित होते.

सुरवातीला राणे यांच्या हस्ते देवतेचे पूजन झाले. सूर्यकांत गावस यांनी देवाला सार्वजनिक सांगणे केले. त्यानंतर शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. यानिमित्त राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा, वेशभूषा, लोकनृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसंस्कृतीचा सण

सत्तरी हा केवळ निसर्गसंपन्न नव्हे तर कलाकारांचीही खाण आहे. आपल्या लोकसंस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिमगोत्सवासारखे उत्सव खूप महत्त्वाचे आहेत. शिमगोत्सव हे केवळ सण नसून लोककलेच्या माध्यमातून आपली संस्कृती जपणारा पर्वणीचा क्षण आहे, असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT