वाळपई: वाळपईसह संपूर्ण सत्तरी भागात भटक्या गुरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांमुळे लहानमोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी वाढत आहे.
वर फिरणाऱ्या व बसणाऱ्या गुरांची संख्या वाढली असून विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक तीव्र होते. ग्रामीण भागासोबतच शहरातील रस्त्यांवरही गुरांचा मुक्त वावर दिसून येतो. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ठाणे, कोपार्डे, वेळुस, वाळपई शहर, भुईपाल, होंडा आदी परिसरात रस्त्यावर गुरे कळपाने बसलेली दिसतात. विशेषतः वाळपई–ठाणे मार्गावरील वेळुस येथे चढावाच्या ठिकाणी सुमारे २० ते ३० गुरांचा कळप रात्री ठाण मांडून बसतो. अशा वेळी वाहनचालकांना अचानक समोर आलेल्या गुरांचा अंदाज न आल्याने अपघात होऊ लागले आहेत.
ही गुरे रात्रभर रस्त्यावरच बसतात आणि सकाळच्यावेळी रस्त्यावर शेणच शेण पडलेले असते त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे होते. एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर गुरे येतात तरी कुठून हा सर्वांना प्रश्न पडला आहे. या गुरांना कोणीच वाली नाही का, वेळुस येथे दुकानांची संख्या वाढलेली असून लोकसंख्येत सुध्दा प्रचंड वाढ झालेली आहे.
हा मुख्य रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाळपई ठाणे मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यात वेळुस मार्गावर रस्त्याच्या बाजुला वाहने पार्क करुन ठेवत असल्याने एका बाजुने वाहने व दुसऱ्या बाजुने रस्त्यावर ठाण मारुन बसणारे गुरे यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरुन वाट काढताना खुप अडचण निर्माण होऊ लागली आहे. या मुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढु लागले आहे आणि त्यात गुरांना सुध्दा दुखापत होऊन जखमी होण्याची घटना घडतात.
सरकार शेतकऱ्यांना गुरे खरेदीसाठी अनुदान देते, मात्र ही गुरे आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे वाळपई नगरपालिकेसह प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून रस्त्यावरच्या भटक्या गुरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कालच रेडीघाट येथे भटक्या गुरांना वाचविताना वाहनचालकाचा टेंपो रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अपघाताची भीती सतत निर्माण होत आहे. भटक्या गुरांमुळे अनेकदा रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांचेही नुकसान होत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनत असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गुरांना मालक असूनही त्यांच्यावर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येते. सकाळी मात्र हीच गुरे दूध काढण्यासाठी आपल्या घरी जात असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.