Wild Animals In Goa: गोव्यात वर्षभरात 5500 प्राणी होतात जखमी, मोक्याच्या ठिकाणी दवाखान्याची नितांत आवश्यकता

wild animal hospital: मोक्याच्या ठिकाणी दवाखाने उभारण्याची आवश्यकता असून अशा दवाखान्यांमुळे हे जखमी प्राणी वाचू शकतात, असे मत फोंड्यातील प्राणीमित्र चरण देसाई यांनी व्यक्त केले.
Wild Animals In Goa
LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: जखमी प्राण्यांची देखभाल करण्यासाठी राज्यस्तरावर मोक्याच्या ठिकाणी दवाखाने उभारण्याची आवश्यकता असून अशा दवाखान्यांमुळे हे जखमी प्राणी वाचू शकतात, असे मत फोंड्यातील प्राणीमित्र चरण देसाई यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी एखादा प्राणी जखमी झाला तर त्याला सकाळ होईपर्यंत वाट पहावी लागते, अशी पुस्ती चरण देसाई यांनी व्यक्त केली. फोंड्यात दोन दिवसांपूर्वी एक जखमी ब्लॅक पँथर सापडला होता; पण गंभीर जखमी त्यातच वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे हा ब्लॅक पँथर मरण पावला होता.

Leopard Bison Sighting In Goa
Wildlife Conflict UsgaoCanva

आठवड्याभरापूर्वी कुंडई डोंगर भागातील मुख्य रस्त्यावर एक जखमी रानडुकराचे पिल्लू सापडले होते; पण सुदैवाने हे पिल्लू बचावले होते. यासंबंधी चरण देसाई म्हणाले की, प्रत्येक राज्यात जनावरांच्या उपचारासाठी दवाखाना आहे; त्याच धर्तीवर गोव्यातही तशी तजवीज वन खात्याने करावी.

Wild Animals In Goa
Goa Wildlife: रस्ते-इमारती-पर्यटन सगळ्यांना गती, वन्यप्राण्यांकडे मात्र दुर्लक्ष; बिबट्याच्या मृत्युनंतर केरकरांची घणाघाती टीका

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेला एखादे जखमी जनावर सापडले तर बाका प्रसंग उद्भवतो; म्हणून प्राण्यांच्या दवाखान्याची आणि २४ तास पशुचिकित्सक डॉक्टराची खरी गरज असल्याचे चरण देसाई म्हणाले.

Wild Animals In Goa
Leopard Death: ब्लॅक पॅन्थर नंतर सांगेतील 'त्या' जखमी बिबट्याचाही मृत्यू; वनमंत्री राणेंचा संताप

देसाई म्‍हणतात...

वर्षभरात फोंडा परिसरात किमान २०० ते २५० जखमी प्राण्यांची प्रकरणे असतात. हाच गोवाभर आकडा साडेपाच हजारपर्यंत पोचतो म्हणून सरकारने राज्यभर सेवा देणारी पशुचिकित्सा यंत्रणा उभारावी, असे मत चरण देसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com