Agriculture Officer Kishore Bhave inaugurating the multi-purpose agricultural machine Gomantak Digital Team
गोवा

Valpoi : बहुपयोगी कृषी यंत्रांमुळे शेतकऱ्यांना फायदा; संदीप केळकर यांच्या यंत्राचे उद्‍घाटन

कृषी अधिकारी किशोर भावे : ब्रह्माकरमळी येथे संदीप केळकर यांच्या यंत्राचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : सत्तरी ही शेतकऱ्यांची भूमी असून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांना आधुनिकतेची शेतीच्या उत्पादन मालावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्रे व त्याची निर्मिती ब्रह्मकरमळीसारख्या गावात होत असल्याने सत्तरीसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन कृषी तथा आत्माचे अधिकारी किशोर भावे यांनी केले.

ब्रह्मकरमळी येथील ओंकार कृषी यंत्र उद्योगतर्फे संदिप केळकर यांनी बनवलेले बहुपयोगी यंत्राच्या उद्‍घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा बागायत संस्थेचे उपाध्यक्ष संतोष केळकर, साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमारपंत, माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर, नरहरी हळदणकर, नगरगाव पंचायतीच्या सरपंचा संध्या खाडिलकर, ॲड. भालचंद्र भावे, संदीप केळकर, मिलिंद गाडगीळ, गो. रा. ढवळीकर, ॲड. शिवाजी देसाई आदींची उपस्थिती होती.

यंत्र उद्योगाचे मालक सर्वेश संदीप केळकर यांनी या मशीनची माहिती दिली. या मशीनद्वारे मिरी मळता येते, कोकम बियांचे टरफले निघतात, हळद पॉलिश करता येते तसेच ‘फणस बी’ची टरफले सुद्धा निघतात, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ॲड. देसाई तर आभार संदेश केळकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

काही शेतकऱ्यांच्या मागणीवरून नवीन मल्टीटास्किंग मशीनची निर्मिती केली. गोव्यात जो कृषी माल तयार होतो, त्यावर प्रक्रिया करण्याच्या संबंधी आपल्याला काम करायचे आहे व मशीन निर्मिती करायचे आहे. आमचे सुपारी सोलनी यंत्र व इतर यंत्रे संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्र ,केरळ, कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यांत गेली आहेत.

- संदीप केळकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT