Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi : वाळपई-बेळगाव अंतर घटणार! पाली जांभळीचे तेंब रस्त्याचे काम पूर्ण

पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण झाल्यामुळे वाळपईहून बेळगांवकडे जाणाऱ्यांसाठी सुमारे 35 किमी इतके अंतर कमी होणार आहे.

dainik gomantak team

Valpoi : कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पाली जांभळीचे तेंब रस्त्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. पावसाळ्यापूर्वी सर्व काम पूर्ण झाल्यामुळे वाळपईहून बेळगांवकडे जाणाऱ्यांसाठी सुमारे 35 किमी इतके अंतर कमी होणार आहे. या मार्गाचा फोंड्यातील प्रवाशांनाही लाभ होणार आहे. या रस्त्यासाठी 4 कोटी खर्च करण्यात आलेला आहे.

पर्ये मतदारसंघातील ठाणे डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात येणारा सुर्ल गाव निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पाली जांभळीकडे जाणारा रस्ता होणे गरजेचे होते. या रस्त्यामुळे सुमारे 35 किमी अंतर कमी होणार आहे. बेळगाव - वाळपई अंतर 70 किमी इतके होणार आहे.

हा रस्ता म्हादई अभयारण्यातून जात असल्याने मोठे चढ उतार आहेत. त्यामुळे सुमारे दोन किमी अंतराचा रस्ता पेव्हर्स घालून करण्यात आलेला आहे. यावरून अवजड वाहतूक झाल्यास हा रस्ता लवकरच खराब होण्याची भीती आहे. यामुळे अवजड वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ प्रवासी वाहतूक करता येणार आहे.

लवकरच रस्त्याचे उद्‍घाटन

रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम अखेर पूर्ण झालेले आहे.त्यामुळे पालीहून जांभळीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता लवकरच या रस्त्याचे आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते रितसर उद्‍घाटन होईल,असे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी स्थानिक पंच सदस्य सुरेश आयकर तसेच ठाणे सरपंच व आमदार डाॅ. दिव्या राणे यांचे विशेष प्रयत्न होते.

पर्यटनदृष्ट्या विकासाची संधी

वाळपईकडून जांभळीचे तेंब त्यानंतर चोर्ला, कणकुंबी, जांबोटी मार्गे रस्ता बेळगावपर्यंत जातो. त्यामुळे चोर्ला घाटातून सत्तरीत येणाऱ्या पर्यटकांना वाव मिळणार आहे. सुर्ला गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पाली धबधबा, माळोली तसेच तांबडीसुर्लकडे जाणाऱ्या पर्यटकांना चांगली सोय आता या रस्त्यामुळे होणार आहे. हा रस्ता वन क्षेत्रात येत असल्याने हाॅटमिक्स डांबरीकरण होणे शक्य नव्हते, त्यामुळे पेव्हर्स बसविण्यात आलेले आहेत.

सत्तरीतील निसर्ग पर्यटनासाठीही या रस्त्याचा फायदा होणार आहे. सुर्ला येथील धबधबा आकर्षक आहे. यामुळे पर्यटकांना पावसाळ्यात या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटता येईल. लोकांना दिलेली आश्वासने टप्याटप्याने पूर्ण करण्यावर आपला भर आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार पर्ये

आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्यामुळे पाली गावाचा विकास झालेला आहे. एकूणच पर्ये मतदारसंघातील विविध विकासकामे राणे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण होत आहेत. कित्येक वर्षापासून रखडलेला पाली जांभळीचे तेंब हा रस्ता अखेर मार्गी लागून पूर्णत्वास आला आहे. परिसरातील ग्रामस्थांतही याचे मोठे समाधान आहे.

- सुरेश आयकर,स्थानिक पंच सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT