stray animals Dainik Gomantak
गोवा

Valpoi Road : वाळपई मार्गावर जनावरांचा उच्छाद ; अपघाताची शक्यता

Stray Animals : वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना अडचण

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, होंडा - वाळपई मुख्य रस्त्यावर भटक्या जनावरांनी उच्छाद मांडला असून दिवस-रात्री ही जनावर रस्त्यावरच बसलेली असतात.

वाहन चालकांनी कितीही हार्न वाजविला तरी ती उठत नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून गेल्या पंधरा दिवसात या जनावरांमुळे अपघातही झाले आहेत. काही दुचाकी चालक जखमी झाले आहेत.

पावसाळ्यात दुचाकी चालकांना मुसळधार पावसावेळी रात्रीच्यावेळी समोरील गुरांचा अंदाज येत नाही. प्रसंगी स्वयंअपघात होऊन चालकांना दुखापत देखील झाल्याची घटना घडल्या आहेत. सत्तरी तालुक्यातील विविध भागात दिवसेंदिवस भटक्या गुरांची समस्या जटिल होत चालली आहे. त्यातच आता गोवंश चोरी होण्याची भितीही वाढली आहे. याआधी सत्तरी भागात गोवंश चोरी होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे होंडा भागात भटक्या गुरांची संख्या वाढत असून रस्त्यावर भटक्या गोवंश त्रासदायक आहेतच. त्याच बरोबरच त्यांच्या सुरक्षितेचाही प्रश्नही गंभीरच बनत चालला आहे.

होंडा -वाळपई मार्गावर दररोज होंडा वडाकडे, बसस्थानक, बाजार, भुईपाल, बस बांधणी प्रकल्प परिसर, सालेली जंक्शन, रेडीघाट या भागात असंख्य प्रमाणात गुरांचा मोठा संचार असतो. पावसाळ्यात वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे.

विशेष म्हणजे होंड्याचा आठवडी बाजार रविवारी ग्राहक व व्यावसायिकांना मोकाटपणे फिरत असलेल्या गुरांचा उच्छाद सुरू असतो. दर रविवारी हे नेहमीचेच चित्र बनले आहे. त्यामुळे सर्वांना भटक्या गुरांचा त्रास सहन करावा लागतो आहे.

ग्राहकांनी खरेदी केलेल्या कृषी मालावर ही गुरे आक्रमण करीत असतात. दोन मोकाट गुरे एकमेकात भांडताना लोकांना समस्या होते आहे. अशावेळी अपघात होण्याचे प्रकार होत आहे. त्यात गुरे जखमी होणे अशा घटना होतात. त्यामुळे दिवसें दिवस वाढणारी ही समस्या बरीच चिंताजनक बनली आहे. एवढा मोठ्या प्रमाणावर भटकी गुरे येतात, तरी कुठून हाच प्रश्न पडला आहे. संबंधित गोवंशाचे मालक तरी कुठे असतात? गोवंशाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही चिंतेचा विषय बनला आहे.

कारवाई करा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी योजनेतील गुरे रस्त्यावर आढळल्यास त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रत्येक पंचायतीने रस्त्यावरील भटक्या गुरांची पहाणी करून कोणती गुरे सरकारी योजनेतील भटकत आहेत. सर्वेक्षण करुन कारवाई केली पाहिजे, असे ग्रामस्थाचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT