Goa To Pandharpur Cycling Dainik Gomantak
गोवा

Goa To Pandharpur Cycling: साखळीच्या माजी सैनिकाची अनोखी 'पंढरपूर वारी': 70-80 किमी सायकल चालवत विठुरायाच्या चरणी होणार नतमस्तक

Retired Soldier Goa Pandharpur Cycling : गणेश नगर, सर्वण-करापूर साखळी येथील निवृत्त सैनिक गणपत विष्णू गावस यांनी गोव्यातून सायकलवर पंढरपूर आषाढी वारी करण्याचा अनोखा निर्धार केला आहे.

Sameer Amunekar

वाळपई: गणेश नगर, सर्वण-करापूर साखळी येथील निवृत्त सैनिक गणपत विष्णू गावस यांनी गोव्यातून सायकलवर पंढरपूर आषाढी वारी करण्याचा अनोखा निर्धार केला आहे. चार ते पाच दिवसांत पांडुरंगाच्या चरणी पोहोचण्याचे ध्येय त्यांनी ठरवले असून त्यांनी मंगळवारी यात्रेला सुरुवात केली.

गणपत गावस यांनी सैन्यात तब्बल २१ वर्षे देशसेवा केली. सैन्यात असताना आषाढी एकादशीला पंढरपूर वारीची इच्छा अपूर्ण राहिली. सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदल्या आणि कर्तव्यामुळे हा योग जुळून आला नाही. मात्र आता निवृत्तीनंतर त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःची आवड आणि फिटनेस जोडत सायकलवरून वारी करण्याचा निश्चय केला आहे.

वारी दरम्यान ते रात्र वारकरी वसतिगृह, मंदिर किंवा वारकऱ्यांसोबत भजनात घालवणार आहेत. वारीच्या मार्गावर काही ठिकाणी विश्रांती घेऊन पुन्हा सायकलवारीला सुरूवात करणार आहेत.

७०-८० कि. मी प्रवास

गावस म्हणाले, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लहानपणापासूनच होती. सैन्यात असताना संधी मिळाली नाही. पण आता पंढरपूरला सायकलवरून पोचायचं ठरवलं आहे.

दररोज ७० ते ८० किलोमीटर सायकल चालवत चार ते पाच दिवसांत विठोबाच्या चरणी पोहोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT