Valpoi power supply Davos will benefit from underground cable Start work soon Dainik Gomantak
गोवा

Valpoi : भूमिगत केबलचा ‘दाबोस’ला होणार लाभ; लवकरच कामाला प्रारंभ!

मिळणार अखंडित वीज : पाणीपुरवठ्यातही येणार सुरळीतपणा

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : वाळपई येथील वीज विभागाला येथील दाबोस जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी भूमिगत केबल टाकण्यास मंजुरी मिळालेली आहे. यामागे वीज खंडित होण्याचे प्रकार कमी करण्याचा उद्देश आहे. वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे पंपिंग मोटर्स थांबतात. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. भूमिगत वीज वाहिन्या घातल्यास दाबोस प्रकल्पाला विनाखंड वीजपुरवठा होऊन पाणीपुरवठ्यातही सुरळीतपणा येईल, असा विश्‍वास वीज अभियंत्यांनी व्यक्त केला.

सत्तरीतील वीज वाहिन्या जुन्या व जीर्ण असून वारंवार त्यात बिघाड होतो. पावसाळ्यात त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यात झाडं, झाडाच्या फांद्या पडणे आणि ओव्हरहेड पॉवर लाईनमध्ये अडथळे येणे हे प्रकार घडतात. त्यामुळे पंपिंग स्टेशनवर वीज खंडित होऊन पाणी पुरवठाही ठप्प होतो. या समस्येवर मात करण्यासाठी वीज विभागाने दाबोस येथे भूमिगत डबल रन केबल टाकण्याला मंजुरी दिली आहे.

1.80 कोटींचा खर्च अपेक्षित; लवकरच ई-निविदा

‘दाबोस’साठी अंदाजे 1.80 कोटी खर्चून 7 किमी अंतरात भूमिगत केबल घालण्यात येणार आहे. सत्तरी तालुक्यातील एकूण 70 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या 45 गावांना ‘दाबोस’मधून दररोज 15 एमएलडी पाणीपुरवठा होतो. वाळपई उपकेंद्रापासून दाबोस प्रकल्पापर्यंत भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च येणार असून लवकरच ई-निविदा काढण्यात येणार आहे.तसेच साट्रे, दरोडे, नानोडा, बांबर, धावे आदी ग्रामीण भागातही भूमिगत केबल घालण्याचा सरकारचा विचार आहे.

वीज कार्यालयात अपुरे कर्मचारी !

काही वेळेला अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दुरुस्तीकामाला विलंब होतो. वाळपई वीज कार्यालयात किमान 40 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती गरजेची आहे. दोन कनिष्ठ अभियंते असून ते कमी पडतात.आपत्कालीन स्थितीत कनिष्ठ अभियंता नसल्यास इतरांवर कामाचा ताण येतो. त्यामुळे काही निर्णयासाठी दुसऱ्याची वाट पहावी लागते,असे दीपक गावस म्हणाले.

तक्रारींसाठी 1912 डायल करा!

बहुतेकदा वीज खंडित झाली, की नागरिक कार्यालयात फोन करतात. मात्र, कित्येकदा संपर्क होत नसल्याने वेळ होतो. त्यामुळे तर नागिरकांनी अभियंत्याला फोन करण्यापेक्षा जर 1912 वर फोन केला तर त्यासंबंधीचा संदेश संबंधित अधिकाऱ्याला जाऊन संबंधित भागात कर्मचारी पाठवले जातात.

आम्ही मॉन्सूनपूर्व कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केली होती. मात्र, ज्या वीज वाहिन्या जीर्ण झाल्यामुळेच जास्त प्रमाणात विजेची समस्या उद्भवू लागली आहे. त्यामुळे आपण सत्तरीतील सर्व भागीचे निरीक्षण करून उपाययोजनेची पावले उचलली आहेत. या समस्यांवर फक्त भूमिगत वीज वाहिनी हाच उपाय आहे.

- दीपक गावस, सहाय्यक अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT