Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

Justice For Moin Sheikh: वाळपई पोलिस स्थानकाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, जेव्हा मृत मोईन शेख याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत न्यायाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: वाळपई पोलिस स्थानकाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, जेव्हा मृत मोईन शेख याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत न्यायाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडले. ‘जस्टीस फॉर माईन शेख’ अशा घोषणा देत आंदोलकांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांना तत्काळ निलंबित करण्याची तसेच पोलिस निरीक्षकांची बदली करण्याची मागणी केली.

कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांनी कोठडीत मारहाण केल्यामुळेच मोईन शेख याने आत्महत्या केली. तसेच तपास प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्या असून, कुटुंबातील महिलेशी गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रथमेश गावस यांच्यासह आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक पोलिस स्थानकाबाहेर जमा झाले होते. घोषणाबाजी करत त्यांनी निष्पक्ष व पारदर्शक चौकशीची मागणी केली. ‘आम्हाला न्याय हवा’ अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

कुटुंबीयांनी पोलिस निरीक्षकांवरही नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही सकाळपासून पोलिस स्थानकात आहोत. मात्र, अजूनपर्यंत कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. पोलिस स्थानक हे न्याय मिळवण्यासाठी असते. मात्र, येथे अन्याय होत आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली असूनही ते अद्याप येथे कार्यरत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांच्या दबावामुळे पोलिसांनी सकाळी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना पोलिस स्थानकात आणले, तर दुपारी त्या मुलीशी संबंध असलेल्या तरुणालाही चौकशीसाठी हजर करण्यात आले. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता आणि आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘प्रकरणाचा तपास सुरू आहे. योग्य प्रक्रिया सुरू असल्याने सध्या काहीही सांगता येणार नसल्याचे’ त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेमुळे वाळपई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पोलिस स्थानकांवरच राहणार, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी पोलिस स्थानकावर तशीच होती.

‘तो’ होता मानसिक तणावात?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मृत मोईन शेख याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संबंधित मुलीने वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी मोईन शेख याला ताब्यात घेतले. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पोलिस कोठडीत असताना त्याला मारहाण करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांची सुटका केली. मात्र, त्यानंतर मोईन शेख मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास वेळूस येथील राहत्या घरी मोईनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीमुळेच त्याने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT