Valpoi Police Cattle Rescue Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: बेकायदेशीर पशुवाहतुकीवर पोलिसांचा घाला; वाळपईत तीन वासरे आणि बैलाची सुटका,संशयिताविरोधात गुन्हा दाखल

Valpoi Police Cattle Rescue: पोस्टवाडा, होंडा येथे कथित पशुक्रूरता व बेकायदेशीर जनावर वाहतूक प्रकरणी वाळपई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन वासरे व एका बैलाची सुटका केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: पोस्टवाडा, होंडा येथे कथित पशुक्रूरता व बेकायदेशीर जनावर वाहतूक प्रकरणी वाळपई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन वासरे व एका बैलाची सुटका केली. या प्रकरणी लक्ष्मीनगर, होंडा येथील मोहम्मद फर्दीन फकीरसाब चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पिसुर्ले येथील हनुमंत परब यांनी याबाबत होंडा पोलिस चौकीत लेखी तक्रार दाखल केली होती. परब हे राज्य प्राणी कल्याण मंडळ तसेच उत्तर गोवा डीएसपीसीए व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.तक्रारीनुसार, पोस्टवाडा येथील पोस्ट ऑफिसजवळ एका बैलासह तीन लहान नर वासरे संशयास्पद परिस्थितीत ठेवण्यात आली होती. या जनावरांची बेकायदेशीर कत्तल होण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

तसेच ही जनावरे आवश्यक कागदपत्रांशिवाय रिक्षातून वाहतूक करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.वाळपई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन सर्व जनावरांची सुटका केली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना नाणूस, वाळपई येथील अखिल विश्व गौशाळा व श्रीकृष्ण गोसंवर्धन केंद्रात हलविण्यात आले आहे. पुढील तपास वाळपई पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT