Illegal Mining  Dainik Gomantak
गोवा

Illegal Mining: वाळपईत दोन अवैध चिरेखाणींवर पोलिसांचा छापा

Illegal Mining in Valpoi: वाळपई पोलिसांनी दोन बेकायदेशीर चिरेखाणींवर छापा टाकला असून तिथली सामान-सामग्री जप्त केली

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi, Sattari

वाळपई सत्तरी येथील बेकायदेशीर चिरेखाणींचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय. रविवारी (दि. २९ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी वाळपई पोलिसांनी अशा दोन बेकायदेशीर चिरेखाणींवर छापा टाकला असून तिथली सामान-सामग्री जप्त केली आहे.

रविवारी संध्याकाळी अचानक या बेकायदेशी खाणींवर छापा टाकून पोलिसांनी तिथे बेकायदेशीरपणे सुरु असलेली मशिनरी ताब्यात घेतली. या दोन्ही बेकायदेशीर खाणी मलपण आणि गवाणे या गावांमध्ये सुरु होत्या.

दरम्यान पोलिसांनी या दोन्ही ठिकाणांहून जनरेटर, ट्रक, JCB अशी २५ ते ३५ लाख रुपयांची मशिनरी जप्त केली आहे. गवाणे सत्तरी इथे सुरु असलेल्या बेकायदेशीर खाणीच्या संदर्भात चिरागदिन बेग (सय्यदनगर, वाळपई) तर मलपण सत्तरी येथील बेकायदेशीर खाणीच्या संदर्भात नासिर हुसेन जमादार (नुवा कॉलनी, वाळपई) यांचा समावेश आढळून आला आहे.

वाळपई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून यापुढील तपासाची माहिती अजून पोलिसांनी माध्यमांना दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: रासई-लोटली स्फोट! पोलिसांकडून सुरक्षा अधिकाऱ्याला अटक

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT