Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Bust: सापळा रचला अन् शिकार टप्प्यात आली! अंमली पदार्थांचे जाळे पसरवणारे परप्रांतीय जेरबंद; वाळपई पोलिसांची कारवाई

valpoi police drug bust: वाळपई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे. येथील गजबजलेल्या कदंब बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३३८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: वाळपई शहर आणि परिसरात गेल्या काही काळापासून अमली पदार्थांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात असतानाच, वाळपई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे. येथील गजबजलेल्या कदंब बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३३८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी तीन परप्रांतीय तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी कारवाई काय?

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री काही व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री किंवा देवाणघेवाण करण्यासाठी कदंब बसस्थानक परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वाळपई (valpoi) पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने परिसरात सापळा रचला. पोलिसांनी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तीन तरुणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ३३८ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची बाजारपेठेत अंदाजे किंमत ३३,८०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

परप्रांतीयांचे धाबे दणाणले

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन आणि बिहारमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी वाळपई परिसरात कोणाच्या संपर्कात होते आणि हे ड्रग्ज कोणाला विकणार होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे गोव्याच्या ग्रामीण भागात ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांचे सातत्य

वाळपई आणि सत्तरी (Sattari) परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचे अमलीपदार्थांचे व्यवहार वाढत चालल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांच्या आड किंवा मजुरीच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीयांच्या माध्यमातून अमलीपदार्थांचे जाळे पसरत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर वाळपई पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

तपास पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रथमेश गावस, सोहम मळीक आणि त्यांच्या विशेष पथकाने केली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस करत आहेत. हे अमलीपदार्थ नेमके कुठून आणले गेले आणि यामागे मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत आहे का, या दिशेने पोलीस तपास चक्रे फिरवत आहेत. "अमली पदार्थ मुक्त वाळपई" करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात अशा काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: कठुआमध्ये भारतीय जवानांचा थरार! जैश-ए-मोहम्मदच्या 'उस्मान'चा खात्मा; पाकड्यांचा मोठा कट उधळला

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

SCROLL FOR NEXT