Sattari Dam Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : सत्तरी तालुक्यात अनेक गावांच्या घशाला कोरड!

गोमन्तक डिजिटल टीम

Sapna Samant

वाळपई : सत्तरी तालुक्यात शेती-बागायतीसाठी जलस्रोत खात्याने म्हादई, रगाडा, वेळूस, वाळवंटी आदी नद्यांवर वसंत बंधारे उभारले आहेत. मात्र, तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावते. जलस्रोत खात्याने या बंधाऱ्यांचे पाणी टाकीमध्ये साठवून ते शुद्ध करून पुरवल्यास येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न संपुष्टात येऊ शकतो. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी स्थानिकांनी केली आहे.

ठाणे, डोंगुर्ली, रिवे, गोळावली, हिवरे, पाली आदी भागात सुमारे १५ बंधारे आहेत. मात्र, त्यांचा वापर शेती-बागायतींसाठी होतो. परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कित्येक गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. हिवरे, डोंगुर्ली भागात तर पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे तेथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. एकमेव पाली गावात एकाच ठिकाणी बंधाऱ्याच्या पाण्याचा वापर जलसिंचन खात्याने पाटबंधाऱ्यामार्फत जलसिंचनासाठी केला आहे. मात्र, उर्वरित गावांमध्ये बंधाऱ्यांचा अशाप्रकारे उपयोग केला जात नाही. मार्च, एप्रिल, मे महिन्यात सत्तरी तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते.

वाळपई येथील दाबोस प्रकल्पातून सत्तरीतील ७० टक्के गावांना पाणी पुरवले जाते. मात्र, दिवसेंदिवस वाढती लोकवस्ती लक्षात घेता हे पाणी योग्य क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जलस्रोत खात्याने बंधाऱ्याचे पाणी शुद्ध करून ते टाकीत साठवून गावांना पुरवल्यास पाण्याचे दुर्भीक्ष्य संपेल. चरावणे येथे जर धरण बांधले तर ठाणेसह म्हाऊस, नगरगाव पंचायतीलाही त्याचा फायदा होऊ शकतो. ठाणे गावची सुमारे ५ हजारहून अधिक लोकसंख्या आहे. येथील ९० टक्के घरांना नळजोडणी केली आहे. मात्र, दिवसाला एक वेळ मर्यादित पाणी सोडले जाते.

ठाणे-डोंगुर्लीतील काही भागात अनियमित पुरवठ्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. चरावणे धरण झाले तर काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटेल. मात्र, अस्तित्वात असलेल्या वसंत बंधाऱ्यांच्या पाण्याचा वापर ते शुध्द करून पिण्यासाठी केला पाहिजे. मार्च ते मे महिन्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. जलस्रोत खात्याने याची दखल घ्यावी.

- नीलेश परवार, पंचसदस्य, ठाणे

चरावणे गावात दरवर्षी पाण्याची टंचाई भासते. चरावणे येथे धरण अपेक्षित आहे. ते झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. सध्या दाबोस पाणी प्रकल्पाचे पाणी आमच्या गावापर्यंत सुरळीतपणे पोहचत नाही. त्याला अनेक कारणे असतील. मात्र, सरकारने लक्ष दिले तर पाण्याची सोय चांगल्या प्रकारे करता येईल. 

- अर्जुन गावस, शेतकरी, चरावणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT