shops Finally the auction of 40 vacant shops Danik Gomantak
गोवा

Valpoi Municipality : वाळपई पालिका करणार रिकाम्या दुकानांचा लिलाव ;आज संपणार बोलीची मुदत

उद्या करीत वाळपई नगरपालिकेने अखेर ४० रिकाम्या दुकानांचा लिलाव जाहीर केला आहे. शुक्रवार, २० ऑक्टोबरपर्यंत यासाठी बोली लावण्याची अंतिम मुदत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Municipality : वाळपई,आज, उद्या करीत वाळपई नगरपालिकेने अखेर ४० रिकाम्या दुकानांचा लिलाव जाहीर केला आहे. शुक्रवार, २० ऑक्टोबरपर्यंत यासाठी बोली लावण्याची अंतिम मुदत आहे.

यामुळे वाळपई नगरपालिकेला अखेर मुहूर्त सापडला असून यातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मात्र, याची वाच्यता करण्यात न आल्यामुळे अजूनपर्यंत बोलीदारांनी यामध्ये भाग घेतलेला नाही‌. दुसऱ्या बाजूने यापूर्वी भाडोत्री तत्त्वावर दिलेले अनेक गाळे ज्या ग्राहकाने नगरपालिकेला परत केलेले आहेत.

त्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यास नगरपालिकेला पूर्णपणे अपयश आले आहे. सध्या निविदा काढलेली असून मुदत संपल्यानंतर निविदा उघडली जाणार आहे.

त्यानंतर नेमकी किती दुकाने गेलेली आहेत याची माहिती उघड होणार आहे.गाळे लिलावात काढण्यात यावेत, अशा प्रकारची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले होते.

याचा फटका पालिकेला बसल्याने आता त्यांना जाग आलेली आहे. यासंदर्भाची नोटीस जारी करण्यात आली असून पालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या प्रकल्प व बाजारामध्ये असलेल्या प्रकल्पातील एकूण ४० दुकानांची लिलाव प्रक्रिया नगरपालिकेने हाती घेतलेली आहे.

बोलीसाठी प्रक्रिया सुरू

यासंदर्भात पालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ४० दुकानाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. यासाठी प्रत्येक चौरस मीटरकरिता २४० रुपये व जीएसटी आकारण्यात येणार असून यासाठी बोली लावण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

वाळपई नगरपालिकेचे कर्मचारी यासाठी वेगवेगळ्या स्तरावर बोलीदार प्राप्त व्हावेत, त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. मात्र, नगरपालिकेने ही प्रक्रिया व्यवस्थितपणे हाती घेतलेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT