वाळपई: वाळपई नगरपालिकेच्या दुकानांमध्ये असलेल्या रिकाम्या दुकानांचा आता लिलाव केला जाणार आहे, त्यामुळे ज्यांना ही दुकानं विकत घ्यायची असतील त्यांनी नागरपालिकेशी संपर्क करावा अशी माहिती वाळपई नगरपालिकेने जाहीर केली आहे. नगरपालिका इमारतीजवळील अनेक दुकानं रिकामीच आहेत आणि म्हणून यांचा लिलाव केला जाईल अशी माहिती वाळपई नगरपालिकेने जाहीर केली होती.
नगरपालिकेचा या लिलावाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून नगरपालिकेने आता या दुकानांचा खुला लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाळपई नगरपालिकडून सर्व मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ही दुकाने नागरिकांना दिली जाणार आहेत.
वाळपई नगरपालिकेने याबद्दल पालिका संचानालयाशी चर्चा करून सगळे कागदपत्री व्यवहार पूर्ण केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वाळपईमधील थिएटर देखील बंद आहे आणि लवकरच या थिएटरचे रूपांतर एका सभागृहात करावे असा पालिकेचा विचार आहे.
सध्या नागरी पुरवठा खात्याचा व्यवहार या इमारतीमध्ये हलवण्यात आला आहे, तसेच मोबाईल ग्राम न्यायालयाचे काम देखील इथे सुरु आहे. यामुळे पालिकेची आर्थिक चणचण बरीच कामी झाली. कामगारांना पैसे देण्याची चिंता मिटली. आता रिकामी दुकानं भाड्याने विकत गेली तर आणखीन महसूल प्राप्त होईल असं वाळपई नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणाले आहेत.
सध्या वाळपई नगरपालिकेकडून काही दुकानं भाड्यानं घेतली गेली आहेत मात्र दुकानदारांनी ही दुकानं बंद केली तसेच भाडे देखील पालिकेला दिलेले नाही. भाड्याची ही रक्कम एक लाख रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचलेली आहे. येणाऱ्या काळात ही थकबाकी वसूल केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं नागरपालिकीने स्पष्ट केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.