Valpoi Bus Accident  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Accident : प्रवासी झोपेत असतानाच कलंडली बस; अपघातात १२ जण जखमी

Valpoi Accident : ही घटना रविवारी पहाटे घडली. या बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. जखमींना तातडीने साखळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Accident :

वाळपई, विजापूर येथून गोव्यात येणाऱ्या एका खासगी प्रवासी बसचा चोर्ला घाटात स्वयंअपघात झाला. ही बस रस्त्यालगत कलंडल्याने १२ प्रवासी जखमी झाले. चोर्ला घाटावरील एका धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही बस कलंडली. सुदैवाने जीवितहानी टळली.

ही घटना रविवारी पहाटे घडली. या बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. जखमींना तातडीने साखळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यातील दहा प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेण्यात आले. पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी साखर झोपेत होते. वाळपई पोलिसांनी चोर्ला घाट येथे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

जखमींची नावे अशी...

अपघातात जखमी झालेले बहुतांश प्रवासी कर्नाटकातील आहेत. त्यात चंद्रशेखर तलवार (वय ४५, रा. कारवार), संमेश जनबुगल (वय ४३ वर्षे, रा. रोशर मुल्ला, कर्नाटक), विकास राठोड (वय २३ वर्षे, रा. विजापूर), बाळू भीमसेन राठोड (वय ४० वर्षे), व्यंकटेश चव्हाण (वय ५० वर्षे, रा. बंगळुरू), रवी राठोड (वय २९ वर्षे), आनंद चव्हाण (वय २५ वर्षे, दोघेही विजापूर), अर्मान मुल्ला (वय ८ वर्षे), हयान हसन खान (वय १४ वर्षे), नुरजान हसन खान (वय १४ वर्षे), अफिया हसन खान (वय १२ वर्षे, सर्व रा. वास्को.) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT