Valpoi Accident  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Accident : रेडेघाटीतील अपघातात दोघे जखमी; टेम्पोची झाडाला धडक

Valpoi Accident : जखमींवर वाळपईत उपचार, वाहनांचेही नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Accident :

वाळपई, बुधवारी संध्याकाळी रेडेघाट वाळपई रस्त्यावर मालवाहू टेम्पोने झाडाला धडक दिल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दोघेजण किरकोळ जखमी झाले.

वाळपई रेडेघाट या मार्गावर होंडाहून वाळपईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक देत गाडी रस्त्याच्या बाहेर एक मीटर खाली जाऊन झाडाला धडकली. यावेळी गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. यावेळी गाडीचालक व आणखी एकाला दुखापत झाली. त्यांच्यावर वाळपई आरोग्यकेंद्रात उपचार करण्यात आले.

सदर रस्‍ता हा गेल्या महिन्यातच हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आला. त्यामुळे रस्ता गुळगुळीत आहे. काही दिवसापूर्वी या मार्गावर एका मालवाहू टेम्पोचा स्वयंअपघात होऊन गाडी रस्त्यावर पलटी झाली होती. हा रस्ता नवीन असल्याने वाहन चालकांनी वाहन हाकताना काळजीपूर्वक हाकली पाहिजे. कारण रस्ता नवीन असल्याने वाहनाचा ताबा सुटू शकतो. पण वाहन चालक बेदरकारपणे गाडी हाकतात, त्यामुळे असे अपघात वारंवार होत आहेत, अशी स्थानिकांनी दिली.

स्कूटर चालकाला धडक

रेडेघाटात टेम्पोचा अपघात झाल्यानंतर नागरिकांची गर्दी झाली होती. त्याचवेळी दोन दुचाकीस्वार अपघात पाहण्यासाठी गाडी उभा करून उभे होते, त्यांना दुसऱ्या एका स्कूटर चालकाने धडक दिली, त्यामुळे त्या वाहनाचेही नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT