Valentine Day Special Story Dainik Gomantak
गोवा

Valentine Day: ..ना उम्र की सीमा हो! व्हॅलेंटाईन डे स्पेशल

Valentine Day Special Story: प्रेमाला वयाची मर्यादा नसते. प्रेम कधीही व कोणावरही होऊ शकते. असेच काहीसे घडले ते अनुप भसीन व संगीता भट्टाचार्य यांच्याशी.

गोमन्तक डिजिटल टीम

योगेश मिराशी

प्रेमाला वयाची मर्यादा नसते. प्रेम कधीही व कोणावरही होऊ शकते. असेच काहीसे घडले ते अनुप भसीन व संगीता भट्टाचार्य यांच्याशी. या दोघांची अनपेक्षितरीत्या ओळख झाली ती कळंगुटमधील निवासी कल्याण संघटनेच्या बैठकीत. दोघेही एकाच अर्पाटमेंटमध्ये राहायचे. संगीता ज्या अर्पाटमेंटमध्ये राहायच्‍या, तिथे सततच्या गळतीमुळे त्रस्त होत्‍या. त्‍यांनी हा मुद्दा अर्पाटमेंटच्या निवासी कल्याण संघटनेच्या बैठकीत उपस्थित केला होता असता अध्यक्ष या नात्याने अनुप यांनी हा प्रश्‍‍न सोडविण्याची जबाबदारी स्वीकारली.

६०वर्षीय अनुप हे यशस्वी उद्योजक. तसेच आनंदी जीवन जगत होते, तरीही अविवाहित होते. त्यांना नात्यात अपेक्षित प्रेम न मिळाल्याने त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले होते. दुसरीकडे, संगीता (५८) यांनी आपल्या पतीला कर्करोगाशी दीर्घ लढाईत गमावले होते. परिणामी त्‍यांचे मन मुंबईत रमत नव्हते. या दुःखातून व मानसिक ताणातून मुक्ती मिळविण्‍याच्‍या उद्देशाने त्‍या गोव्यात स्थलांतरित झाल्‍या. कारण गोव्यातील शांत वातावरणात आपल्‍याला सांत्वन मिळेल असा त्‍यांचा विश्‍‍वास होता.

संगीता यांनी आपली विस्कटलेली आयुष्याची घडी पुन्हा नव्याने बसवण्यास सुरवात केली. नवीन घराची जबाबदारी त्‍यांनी स्वीकारली. संगीत व कला क्षेत्रात प्रचंड आवड. मात्र, आवडीनुसार काम करण्याची संधी मिळाली नाही. गोव्यात तीन वर्षांहून अधिक काळ झाल्यानंतर त्‍यांनी जवळच्याच एका शाळेत कला शिक्षिका म्हणून काम करायला सुरवात केली. एकप्रकारे संगीता स्वतःच्या स्वातंत्र्यात रमल्‍या.

याच काळात, त्‍या राहणाऱ्या अर्पाटमेंटमधील निवासी कल्याण संघटनेचा गट प्रत्येक सण साजरे करायचा. शिवाय मेळावे व सहलींचेही आयोजन करत असे. अपार्टमेंटमधील गळतीच्या समस्येचे निराकरण करण्यापासून सुरू झालेली अनुप व संगीता यांच्यातील अनपेक्षित मैत्री आता त्यांच्या दैनंदिन अस्तित्वातील प्रत्येक लहान तपशिलाची देवाणघेवाण करण्यापर्यंत पोहोचली होती. अशातच दोघेही त्यांच्या ओट्यावर बसून सूर्यास्त पाहत बसायचे व जीवनाबद्दल बोलायचे.

कालांतराने सायंकाळच्या वेळी चहा पिण्याचा त्यांचा हा जणू दिनक्रम बनला. कधी-कधी एक अर्थपूर्ण नाते निर्माण करण्यासाठी व काळानुसार अधिक मजबूत होणारे बंध जोपासण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. परंतु इतरवेळी जणू काही विश्‍‍व लोकांना एकत्र आणण्याचे घाट घालते. ते म्हणतात ना, प्यार सच्चा हो, तो पुरी कायनात आपको मिलाने में लग जाती है! थोडेसे फिल्मी आहे पण युनिव्हर्सचा जादूई फंडा हाच आहे.

एके दिवशी समुद्रकिनाऱ्यावर संगीता व अनुप चालत असताना, संगीता यांना त्‍यांच्‍या मुलीचा फोन आला. मुलीने त्‍यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याची बातमी दिली.

संगीताची मुलगी आपली आई न्यूजर्सीमध्ये येणार म्हणून खूष झाली होती, तर संगीता यांच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण त्‍यांच्‍या मनात प्रश्‍‍न निर्माण झाला की, अनुपशिवाय आपण काय करणार? कारण मागील काही काळातील सहवासामुळे दोघेही एकमेकांशी मनाने जोडले गेले होते.

एकमेकांना मिळालेल्या सहवासामुळे मनाने ते जवळ आले होते. त्‍यातच संगीता अमेरिकेला जाणार व अनुप गोव्‍यातच राहणार, या विचारात दोघेही किनाऱ्यावरून समुद्राकडे एकटक बघत राहिले. शांतपणे चालत असताना फक्त किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांची गाज दोघांना ऐकू येत होती. दोघांनाही माहिती होती की, त्यांना त्यांच्या परिस्थितीच्या वास्तव्याला तोंड द्यावेच लागेल.

संगीता यांचा अमेरिकेला जाण्याचा दिवस जसजसा जवळ आला, तसतसे त्‍या व अनुप अधिकाधिक भेटू लागले. येणाऱ्या वियोगामुळे त्यांच्यात निकडीची भावना निर्माण झाली होती आणि ते दोघेही शक्य तितका वेळ एकत्र घालवू लागले.

एके दिवशी दोघेही किनाऱ्यावर असताना संगीता यांच्या डोळ्यासमोर मागील आठवणींचा फ्लॅश-बॅक तरळला. त्‍यांना समजले होते की, मागील तीन वर्षांत काहीतरी बदलले आहे. अनुपला पाहताच संगीता यांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. त्‍यांना इतक्या दिवसांपासून जाणवत असलेली पोकळी अनुपच्या प्रेमाने, त्याच्या पाठिंब्याने व त्याच्या उपस्थितीने भरून आली होती. अनुपसोबत असताना संगीता यांना स्वतःला सुरक्षित वाटू लागले. आपल्या भावना लपवण्यासाठी त्‍यांनी कुठलीही लपवाछपवी केली नव्हती.

या विचारांमध्‍ये असताना, अनुप यांनी संगीता यांचा हात धरला व आपल्‍या मनातील गोष्ट बोलून दाखविलीच. ‘प्लीज डोंट लिव्‍ह मी’ (कृपया, मला सोडून जाऊ नकोस). यावर संगीता यांनी हसत-हसत उत्तर दिले, तुझ्याशिवाय मी काय करणार? तिच्या आवाजात प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली व वचनबद्धता होती. दोघांनी एकमेकांना आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. म्‍हणूनच म्हटले जाते की, प्रेमात पडायला काळ, वेळ, वयाचे बंधन लागत नाही. अट फक्त एकच... मन तरुण असायला हवं!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

SCROLL FOR NEXT