मुलांचे लसीकरण Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांचे आजपासून लसीकरण

आजपासून प्रारंभ: पन्नास हजार विद्यार्थ्यांना लस

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना विरोधात लढण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील 74 हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण होत असतानाच आता 12 ते 14 वयोगटातील मुलांना भारतीय बनावटीची कार्बोक्स लस राज्यात आजपासून देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने सर्व तयारी केली असून हे लसीकरण प्रामुख्याने शाळांमध्ये दिले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले असून 26,37,399 डोस देण्यात आले आहेत, तर 15 ते 18 वयोगटातील 74 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष्य ठेवून या वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देणे सुरू ठेवले आहे. यातील 89 टक्के विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला असून 75 टक्के मुलांनी दुसरा डोसही घेतला आहे. आता 12 ते 14 वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार असून याचा प्रारंभ आजपासून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चक दे इंडिया! टीम इंडियाच्या लेकींनी इतिहास रचला, नेपाळचा पराभव करत जिंकला विश्वचषक Watch Video

"नोकरी घोटाळ्यावर बोलणार पण..." पूजा नाईकच्या आरोपांवर मंत्री सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केली बाजू

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

SCROLL FOR NEXT