Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: 12 ते 14 वयोगटातील 800 मुलांचे लसीकरण

राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही बळी नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात दिवसेंदिवस कोरोना (Covid-19) बाधितांचे प्रमाण कमी होत असून सक्रिय रुग्णांची संख्याही आता केवळ 72 आहे याशिवाय अधिकचा उपचारासाठी रुग्णालयात कोणालाही भरती केले गेले नसून मृत्यूचे प्रमाणही शून्यावर आले आहे. ह्या दिलासा देणाऱ्या बातम्या असल्या तरी दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये पुन्हा कोरोनाची संख्या वाढत असल्याच्या माहिती आहे त्यामुळे सध्यातरी लसीकरणाला पर्याय नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आता 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची (Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली असून काल 11 केंद्रांवर सुमारे 800 विद्यार्थ्यांना भारतीय बनावटीची कार्बोवक्स ही लस देण्यात आली, अशी माहिती राज्य लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

राज्यात यापूर्वीच 18वर्षे वयोगटावरील सर्वांना लसीकरणाचे दोन डोस देण्यात आले आहेत तर 15 ते 18 वयोगटातील 74 हजार मुलांपैकी 90 टक्के मुलांना लसीकरणाची मात्रा देण्यात आली आहे. आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी ही लस देण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे.

पॉझिटिव्हिटी रेट 0.65 टक्के

राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही बळी नाही तर अधिकच्या उपचारासाठी कोणालाही दवाखान्यात भरती केलेले नाही.तर कोरोना संक्रमणाचा दरही 0.65 टक्के इतका खाली आला आहे. तर आज सक्रिय रुग्णांची संख्या 72 इतकी झाली आहे . तर गेल्या चोवीस तासात नवे 6 बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 226 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 324 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.41 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 72 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 830 कायम आहे. काल दिवसभर 912 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राज्यात एकूण कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत असून काल 19 जण कोरोनातून पूर्ण मुक्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT