1 डिसेंबरपासून फक्त आरोग्य केंद्रावरच दैनंदिन लसीकरण (vaccination) करण्यात येणार आहे.

 
Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1 डिसेंबरपासून लसीकरण मोहीम फक्त आरोग्य केंद्रांवरच

लसीकरण (vaccination) 1 डिसेंबरपासून, 35 सरकारी आरोग्य केंद्रावर सुरू राहील. कारण शाळेत सुरु असलेल्या लसीकरणाच्या जागेची मागणी शाळा प्रशासनाने केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) 87% लोकांचे लसीकरणात (vaccination) दोन्ही डोस झाले असल्याने आता सरकारी क्षेत्रात, 1 डिसेंबरपासून फक्त आरोग्य केंद्रावरच दैनंदिन लसीकरण करण्यात येणार आहे. शाळा, पंचायती इत्यादी ठिकाणी उभारण्यात आलेली सर्व तात्पुरती लसीकरण केंद्रे नोव्हेंबर अखेर बंद करण्यात येणार आहेत.

लसीकरण 1 डिसेंबरपासून, 35 सरकारी आरोग्य केंद्रावर सुरू राहील. कारण शाळेत सुरु असलेल्या लसीकरणाच्या जागेची मागणी शाळा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. असे आरोग्य सेवा संचालक डॉ. इरा आल्मेडा यांनी सांगितले. दोन जिल्हा आणि दोन उपजिल्हा रुग्णालये, सहा सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि 24 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आता लसीकरण होणार आहे.

“हर घर दस्तक मोहिमेचा एक भाग म्हणून महिन्याच्या अखेरीपर्यंत लसीकरण पथके लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहेत. दररोज ते गावोगावी जाऊन आरोग्य केंद्रात न पोहोचलेल्यांचे लसीकरण करत आहेत. याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहेत. रविवारी 4 हजार 314 व्यक्तींनी त्यांचा दुसरा डोस घेतला आणि 1 हजार 008 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. आजपर्यंत 10.2 लाख लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत तर, 2.37 लाखांना लोकांनी एक डोस घेतला आहे. गोव्यात सध्या लसीचे 2.13 लाख डोस शिल्लक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: 1200 भाविकांना घेऊन खास रेल्वे अयोध्येला रवाना

Arpora Sarpanch: 'हा 25 निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर गुन्हा', हडफडे सरपंचांच्या जामीन अर्जावर निकाल राखीव

SCROLL FOR NEXT