Goa Vaccination campaign Dainik Gomantak
गोवा

Vaccination: गोव्यात 185 केंद्रांमध्ये लसीकरण अभियान

गोव्यात 70 केंद्रांद्वारे प्रतिदिन आठ दिवस लसिकरणाची सेवा देण्यात येणार आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस (Vaccination) घेतली नाही, त्‍यांना ती घेण्‍यासाठी सुविधा व्हावी यासाठी आरोग्य खात्याने 16 सप्टेंबरपासून टीका उत्सव 3.2 सुरू केला. सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रे येथील कायमस्वरुपी 40 लसीकरण केंद्रासह गावागावातील पंचायतींच्या मागणीनुसार एकूण 185 केंद्रांत हे लसीकरण होणार आहे.

यातील किमान 70 केंद्रे पुढील आठ दिवस दरदिवशी कुठे ना कुठे सुरूच राहणार आहेत. गोव्यात कोविड प्रतिबंधक पहिली लस 100 टक्के झाली आहे. मात्र, दुसरी लस अद्याप 55 टक्के लोकांनी घेतलेली नाही. उद्दिष्‍टपूर्ती करण्‍यासाठी विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत आज दिवसभरात 12 हजार 839 एवढे लसीकरण झाले आहे.

Vaccination

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या ऑनलाईन संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी सकाळी 10.30 वा. कोविड प्रतिबंधक लस लाभार्थी व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधतील. पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य व्याख्यान सभागृह, रवींद्र भवन, मडगाव, सांगे म्‍युनिसिपल सभागृह, राजीव कला मंदिर, फोंडा, म्युनिसिपल सभागृह साखळी, जुने आझिलो हॉस्पिटल सभागृह म्हापसा येथे थेट प्रसारित केला जाईल.

वरील प्रमुख ठिकाणांशिवाय राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये संवाद थेट प्रक्षेपित केला जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या वॉर्डातील नागरिकांसह आपापल्या स्थानिक संस्थेच्या सार्वजनिक स्क्रिनिंगला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे. राज्यभरातील सर्व प्राथमिक, शहरी आणि सामाजिक आरोग्य केंद्रांवरही हा कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली आहे.

Vaccination

‘टिका उत्सव 3.2’ अंतर्गत राज्यात एकूण 185 केंद्रांत लसीकरण होणार आहे. एका दिवशी सुमारे 70 ते 75 केंद्रांवर लसीकरण पुढील 8 दिवस सुरूच ठेवण्‍यात येईल. लोकांनी याचा लाभ घ्‍यावा.

- डॉ. राजेंद्र बोरकर, लसीकरण मोहिमेचे प्रमुख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT