Russian Tourist In Goa Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist In Goa: ताश्कंद-गोवा फ्लाइट; 'या' नवीन मार्गानेही रशियन पर्यटकांना येता येणार गोव्याला

गोमन्तक डिजिटल टीम

उझबेकिस्तान एरवेजकडून 27 ऑक्टोबर 2024 पासून ताश्कंद ते गोवा अशी थेट विमानसेवा सुरु केली जाणार आहे. या नवीन मार्गामुळे केवळ ताश्कंदमधीलच नाही तर रशिया, किर्गिस्तान आणि कझाकिस्तानसह कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्समधील इतर पर्यटकांना देखील सहज गोव्याचा प्रवास करणे शक्य होणार आहे.

"गोव्यासाठी उड्डाण करीत असताना आम्ही केवळ ताश्कंद नाही तर उफा, कझान, नोवोसिबिर्स्क आणि इतर देशांमधील पर्यटकांशी कनेक्ट करू शकतो," असे उझबेकिस्तान एअरवेजचे भारताचे स्टेशन मॅनेजर साबिरोव राखिमबर्डी म्हणाले.

उजबेकिस्तान एरवेजकडून दिल्ली आणि मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरूच आहे आणि आता यात गोवाही जोडला जाईल. अधिकाधिक विद्यार्थी या मार्गाचा वापर करीत असल्याने या नवीन मार्गामुळे कझानमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, तसेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये देखील वाढ होणार आहे.

रशियामधून होणारी उड्डाणे फक्त मॉस्को आणि येकातेरिनबर्गमधून चालतात. त्यांची केवळ दोन गंतव्यस्थाने सुरु आहेत. ताश्कंदमधून गोव्याचा प्रवास करायचा असेल तर आता उझबेकिस्तान एरवेजकडून रशियन प्रवाशांसाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

एरो वर्ल्ड ट्रॅव्हल्सच्या माहितीनुसार गोवा ते ताश्कंद या परतीच्या विमानसेवेसाठी 35 टक्के जागांसाठी बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. गोव्यासाठी सुरु केलेल्या या नवीन हवाईमार्गाची अधिक माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उझबेकिस्तान एअरवेजने गोव्यात एक रोड शो आयोजित केला आहे.

या कार्यक्रमामधून उझबेकिस्तान आणि भारतातील ट्रॅव्हल एजन्सी, ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना छोट्या भेटीसाठी आमंत्रित करण्याची योजना आखली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

SCROLL FOR NEXT