BJP Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांच भावनिक वक्तव्य, भाजपवर टीकास्त्र

उत्पल पर्रीकरांनी अखेर भाजपला राजीनामा देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे

दैनिक गोमन्तक

गोव्यात दिवसागणिक येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना देखील राजकीय नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काही नेते पक्ष सोडताना दिसत आहेत. हे सर्व जरी असले तरी मागील दिवसात गोव्यातील एक उमेदवार चांगलाच चर्चेत होता. ते म्हणजे दिवंगत भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर. त्यांनी आज अखेर भाजपला राजीनामा देत आपला अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय आज पत्रकार परिषद घेत व्यक्त केला.

''मी पणजीणमधून अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मला अनेक राजकीय पक्षांनी ऑफर दिली आहे. मी त्यांचं धन्यवाद मानतो. पणजीमधील तमाम मतदारांसाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केले त्यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवत आहे. माझ्यावर अन्याय झाला मला काही त्याचं वाटत नाही. जेव्हा माझे वडिल गोव्याच्या सक्रीय राजकारणात होते तेव्हा त्यांनी गोव्यातील जनतेसाठी कार्य केले.''

या निर्णयाबाबत उत्पल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांनी दोन दशके पणजी करांची सेवा केली आहे. त्यांच्यात आणि जनतेत विशेष नाते आहे. माझेही येथील नागरिकांशी घट्ट नाते आहे. मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भाजपला सांगितले. मात्र तरीही मला उमेदवारी देण्यात आली नाही. आणि मी तत्वांसाठी लढत आहे अस म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT