Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar : उत्पल पर्रीकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर गुप्त बैठक

मोबाईल बंद : मनोहर पर्रीकर यांच्या पणजी शहराविषयीच्या व्हिजनवर चर्चा

आदित्य जोशी

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी शहराचा कायापालट करण्यासाठी व्हिजन ठेवले होते. त्यानुसार सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यांनी कोणते प्रकल्प शहरात आणण्याची योजना आखली होती, त्याविषयीची माहिती देण्याबरोबरच महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी उत्पल पर्रीकर यांनी शनिवारी सायंकाळी एक गुप्त बैठक केली.

मिळालेल्या माहितीनुसार बैठकीचे मोबाईलवर छायाचित्र अथवा चित्रिकरण करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली होती.

सूत्रांनी सांगितले, या बैठकीस पणजीतून सुमारे दीडशे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. साडेसात वाजता सुरू झालेली बैठक सुमारे अडीच तास चालली. व्यासपीठावर मनोहर पर्रीकर यांचे मोठे छायाचित्र ठेवण्यात आले होते, त्यास पुष्पहार अर्पण करून उत्पल यांनी या बैठकीस सुरुवात केली. मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे नेतृत्व करताना 50 वर्षे पुढील शहराचा चेहरा कसा असेल, हे पाहूनच अनेक प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. पणजीला स्मार्ट सिटीची कल्पनाही त्यांनीच पुढे नेली आणि त्या योजनेंतर्गत कामे सुरू झाली आहेत, याचा उल्लेख उत्पल यांनी केला.

शहरातील रूअं दी ओरेम खाडीवर उभारणी करण्यात येत असलेला पदपूल, पाटोवरील मलनिस्सारण प्रकल्प, मळ्याच्या तलावातील पाणी उपसा प्रकल्प, रायबंदर येथील भूमिगत वीजपुरवठा अशी कामे त्यांनी मार्गी लावली.

मतदारसंघातील सर्व प्रभागांतून प्रमुख कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी आपापल्या प्रभागांतील विविध समस्या याप्रसंगी उत्पल यांना सांगितल्या. या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील, याविषयी नक्कीच विचार केला जाईल. त्याचबरोबर आपण समाजासाठी जे काम करत आहोत, ते सुरूच राहील, असा विश्‍वास उत्पल यांनी व्यक्त केला.

सध्या शहरात जी कामे सुरू झाली आहेत, ती कामेही मनोहर पर्रीकर यांच्या काळात मंजूर झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर उत्पल यांनी आवाज उठवल्यानंतर कोणाच्या दबावाने का होईना पण सध्याचे आमदार काहीतरी काम करत आहेत. जरी ते काम कमी दर्जाचे असले तरी काम केल्याचे दाखवले जात असल्याचे कार्यकर्त्यांनी बैठकीत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

Ponda By-Election: फोंड्यात आता भाजपविरुद्ध भाटीकर? भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा रिंगणात; काँग्रेसचे सावध डावपेच

Shirgaon Jatra: शिरगाव जत्रेपूर्वी धोकादायक कुंपण हटवले, भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने दिले होते निर्देश

Egg price: ब्रॉयलर अंडी झाली स्वस्त; 70 रु. डझन, आवक वाढली; डझनमागे 20 रुपयांनी घट

SCROLL FOR NEXT