

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर होमकुंड स्थळाजवळील वादग्रस्त कुंपण अखेर हटवण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतर संबंधित मालकाने सामंजस्याची भूमिका घेत स्वतःहून हे कुंपण हटवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्यालगतचे अडथळे दूर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे धोंड तळी ते होमकुंड परिसरातील उतरणीवरील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र, शिरगावहून अस्नोड्याकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या धोकादायक अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
यापूर्वी २०२४ मधील जत्रेदरम्यान या अतिक्रमणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, धोंड तळी ते होमकुंड उतरणीचे सपाटीकरण काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
असे हटवले कुंपण
गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे कुंपण हटवण्याची मागणी होत होती. ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला होता. पंचायतीने कुंपण हटवण्याचा आदेश दिला, मात्र संबंधित व्यक्तीने आव्हान दिल्यानंतर पंचायत संचालनालयाने आदेशाला स्थगिती दिली. यंदाच्या जत्रेपूर्वी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी पाहणी करून अतिक्रमण कुंपण निर्देश दिले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर व मामलेदार शैलेंद्र देसाई यांनी मध्यस्थी करत कुंपण हटवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.