भूखंड घोटाळ्यातील आरोपीच्या पत्नीला बंगळूरमध्ये अटक

बनावट दस्तावेज तयार करून अनेकांना भूखंडांच्या विक्रीतून जमा केलेली रक्कम पत्नीच्या बँक खात्यावर ठेवली होती.
lady arrested for land scam in goa
lady arrested for land scam in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात खळबळ माजवलेल्या जमीन हडप घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने प्रथमच एका महिला अंजुम शेख (41) हिला बंगळूर येथे जाऊन अटक केली. ती या घोटाळ्यातील मास्टरमाईंड संशयित महम्मद सुहेल शफी याची पत्नी आहे.

बनावट दस्तावेज तयार करून अनेकांना भूखंडांच्या विक्रीतून जमा केलेली रक्कम पत्नीच्या बँक खात्यावर ठेवली होती. त्यामुळे ती सुद्धा या कटकारस्थानात सामील असल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने तिला 4 दिवसांची पोलिस कठडी दिल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

संशयित अंजुम शेख हिने मास्टरमाईंड पती महम्मदच्या मदतीने तक्रारदार इसिनो कोरास्को यांची हणजूण येथील मालकीचा जमीन मडगाव येथील सलिम शेख याला विकली होती. एसआयटीने आतापर्यंत तीन प्रकरणांचा तपास सुरू केला आहे तर इतर पोलिस स्थानकात नोंद झालेल्या प्रकरणांचाही तपास सुरू ठेवला आहे. आतापर्यंत एसआयटीकडे भूखंड घोटाळा प्रकरणीच्या सुमारे 151 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एसआयटीने या बनावट दस्तावेजद्वारे भूखंड घोटाळाप्रकरणी या महिलेसह आठ जणांना अटक केली आहे. सहा संशयित सध्या सशर्त जामिनावर आहेत. आसगाव, कळंगुट येथील प्रकरणांचा सध्या तपास सुरू आहे.

lady arrested for land scam in goa
आयआयटीसाठी लवकरच गोव्यात कायमस्वरूपी संकुल!

संशयित महम्मद सुहेल शफी पोलिसांनी अटक केल्यानंतर बनावट दस्तावेज तयार करून भूखंडांची विक्री केल्याची कबुली दिली होती व त्याने त्याची माहितीही उघड केली होती. त्याला त्यासाठी सहाय्य करणाऱ्या फोंड्यातील पुरातत्व विभागातील दोघा कर्मचाऱ्यांना अटकही झाली होती. संशयित महम्मद सुहेल याच्याविरुद्ध 2013 मध्ये बनावट दस्तावेज तयार करून भूखंड हडपप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झालेला होता. त्याच्याविरुद्ध 2018 मध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता त्याविरुद्ध सध्या पणजीतील न्यायालयात खटला सुरू आहे तर तिसरा गुन्हा म्हापसा पोलिसात दाखल झाला होता व न्यायालयातील खटला पूर्ण झाला आहे.

दाम्पत्याची बँक खाती गोठवली

महम्मद हा घोटाळ्यातील रक्कम पत्नी अंजुमच्या बँक खात्यात जमा करत होता. त्यामुळे पोलिसांनी सुहेल व अंजुमची बँक खाती गोठवली आहेत. घोटाळ्याच्या तपासासाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी तसेच उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com